Vat savitri 2023 : पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात वटसावित्रीची पूजा, वाचा वडाच्या झाडाचं महत्त्व
आज वटपौर्णिमेचा म्हणजेच वटसावित्रीचा सण. हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजेच वटपौर्णिमेचा सण.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
भारताच्या उत्तर भागात वटपौर्णिमेचं हे व्रत अमावस्या तिथीला पाळले जाते आणि महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिण भागात हे व्रत पौर्णिमा तिथीला पाळले जाते.
वट सावित्री पौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची आणि भगवान विष्णूची पूजा करतात. असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात
हिंदू धर्म मान्यतेनुसार, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा आज सकाळी 11:16 वाजता सुरू होईल आणि उद्या सकाळी 09:11 वाजता समाप्त होईल.
धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचं फार महत्त्व आहे. हे झाड त्रिमूर्तीचे, सालात विष्णूचे, मुळात ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिवाचे प्रतीक आहे. हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते, म्हणून त्याला 'अक्षयवत' असेही म्हणतात. सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत. वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे.
वटवृक्षात भगवान विष्णू वास करतात आणि त्यांची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात. इतकंच नव्हे तर, संतानप्राप्तीसाठीही अनेक महिला वटवृक्षाची पूजा करतात.
सावित्रीच्या वरदानामुळे या दिवशी तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळाले, तिच्या सासू-सासऱ्यांना दृष्टी मिळाली आणि त्यांना धनसंपत्तीही लाभली. तेव्हापासून जीवन, सुख, शांती, ऐश्वर्य, कीर्ती, ऐश्वर्य मिळण्यासाठी हे व्रत केलं जातं.