जवाहरलाल नेहरूंसोबत नर्गिस दत्तचे होते खास नाते , त्यामुळे नर्गिस दत्त नेहरू घराण्याशी गेली होती जोडली
नर्गिस दत्त या भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक दिग्गज चित्रपटांमध्ये काम केले असतानाच त्यांचे नेहरू घराण्याशीही विशेष नाते होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाॅलीवूडची शानदार अभिनेत्री नर्गिस दत्त हिची आई जद्दनबाई आणि वडील मोहन बाबू होते. जद्दनबाई या मुस्लीम होत्या.
लेखक मोहन देसाई यांनी नर्गिसच्या कुटुंबावर लिहिलेल्या पुस्तकात दिवंगत अभिनेत्रीच्या कुटुंबाचा नेहरू घराण्याशी सखोल संबंध असल्याचे नमूद केले आहे.
नर्गिसच्या लग्नानंतर सुनील दत्त आणि नेहरू घराण्याचे ही संबंध वाढले होते.
पुस्तकात लिहीले गेले आहे की , जद्दनबाई या सुरूवातीपासूनच नेहरू घरण्यासोबत जोडली गेली होती. नर्गिस दत्तची आई पंडित नेहरूंना भाऊ मानत होत्या. त्यामुळे पंडित नेहरू नर्गिसला आपल्या मुलीसारखे मानत होते.
नर्गिस दत्त यांची इंदिरा गांधी सोबत खूप जवळीक होती.
अनेक वर्षांनी नर्गिसला चित्रपटातील उत्कृष्ट कामामुळे राष्ट्रीय सन्मान पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. तिला राज्यसभेसाठीही नामांकन मिळाले होते.
त्याचवेळी नर्गिस यांच्या निधनानंतर त्यांचे पती आणि अभिनेते सुनील दत्त यांनी काँग्रेसचे खासदार आणि मंत्रीपद भूषवले होते.
सुनील दत्त यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी प्रिया यांनी राजकारणात प्रवेश केला आणि मुंबईतील त्यांच्या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली.