Chocolate Day 2023 : गोड चॉकलेटचे आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदे
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट्स खायची आवड असते. डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट असे अनेक प्रकारचे चॉकलेट्स बाजारात मिळतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या 'व्हॅलेंटाईन वीक' ( Valentine Week ) सुरू आहे. 'व्हॅलेंटाईन वीक'चा आजचा तिसरा दिवस आहे. हा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो.
'चॉकलेट डे' च्या दिवशी प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता.
डार्क चॉकलेट योग्य प्रमाणात खाल्ल्यानं ह्रदयासंबंधित त्रास दूर होतात. डार्क चॉकलेटमुळे बीपी कमी होतो हे अनेक संशोधनातून समोर आले आहे.
चॉकलेटमध्ये विशिष्ट प्रमाणात सेरोटोनिन, न्यूरोट्रांसमीटर आणि ट्रिप्टोफॅन असते, जे तुमचं मन प्रसन्न करते. मानसिक स्वास्थ देखील चॉकलेट खाल्ल्यानं चांगले राहते.
हॉट चॉकलेट मिल्क तसेच व्हाईट चॉकलेट, चॉकलेट आईस्क्रिम हे चॉकलेटचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. डार्क चॉकलेट खाल्ल्याने ब्लड फ्लो चांगला होतो. चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशाली ठरतं.
योग्य प्रमाणात चॉकलेट खाल्ल्यानं वजन देखील कमी होतं, असं कॅलिफोर्नियाच्या सॅन डिगो विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनामुळे स्पष्ट झालं.
डार्क चॉकलेट रक्त प्रवाह सुधारते ज्यामुळे शरीरात योग्य ऑक्सिजन पोहोचतो. डार्क चॉकलेटमुळे हृदयाचे आजार कमी होतात, असेही काही संशोधनातून समोर आले आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.