Photo : दसऱ्या निमित्त पाहा पारंपरिक दागिन्यांचा साज!
सण म्हणलं की स्त्रियांची पहिली पसंती असते ती दागिन्यांना, दागिन्यांचे कितीही वेगवेगळे प्रकार आले तरी सोन्याचे पारंपरिक दागिने अजूनही स्त्रीयांच्या मनावर राज्य करतात.. चला तर दसऱ्यानिमित्त पारंपरिक दागिन्यांवर नजर टाकूया..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतोडे : स्त्रियांचा आवडता दागिना म्हणजे तोडे.. कोणत्याही रंगाच्या बांगडयापुढे तोडे घातले की हात अगदी उठून दिसतात..
ठुशी: मराठमोळा, पारंपरिक पण मॉडर्न टच असलेला हा दागिना महिलावर्गाची खास पसंती असतो.. नाजूक पण ठसठशीत ठुशी प्रत्येकाच्या कलेक्शन मध्ये असायलाच हवी..
नथ : मराठी स्त्री म्हणलं की नथ ही आठवतेच, सध्या बाजारात उपलब्ध असलेली हिऱ्याची, खड्याची नथ ही पारंपरिक मोत्याच्या नथीपुढे फिकी पडते..
पोहे हार: नावाप्रमाणे दिसणारा पोहे हार हा वर्षानुवर्षे स्त्रियांच्या गळ्याची शान वाढवतायत..
वाकी : नऊवारी आणि त्यासोबत दंडात घातलेली वाकी मराठमोळ्या स्त्रीचं सौंदर्य आणखीचं वाढवतात..
भोर माळ : दोन पदरी, तीन पदरी भोर माळ आजही ट्रेंड मध्ये असते, सध्या ट्रेंड मध्ये असलेली oxidise भोर माळ स्त्रियांचं खास आकर्षण ठरतायत.. (सर्व फोटो : सोशल मीडिया)