PHOTO : चीनला धडकी भरवणाऱ्या भारताच्या Malabar युद्धाभ्यासाला सुरुवात

(photo tweeted by @indiannavy)

1/10
इंडो-पॅसिफिक हा समुद्री प्रदेश मुक्त आणि सुरक्षित राहिला पाहिजे तसंच या प्रदेशातील सर्वांचे हितसंबंध समान जपलं पाहिजे यासाठी हिंदी महासागरातील बंगालच्या उपसागरात बुधवारपासून क्वाड देशांचा 'मलबार 21' हा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. (photo tweeted by @indiannavy)
2/10
भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या दरम्यान 1992 साली या युद्धाभ्यासाला सुरुवात झाली. त्यानंतर 2015 साली यामध्ये जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश करण्यात आला. (photo tweeted by @indiannavy)
3/10
इंडो-पॅसिफिक प्रदेश हा मुक्त आणि सुरक्षितच राहीला पाहिजे यासाठी भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलिया हे चार देश एकत्र आले आहेत. (photo tweeted by @indiannavy)
4/10
या प्रदेशात चीनचे वर्चस्व वाढत आहे. त्यामुळे एकमेकांना सहकार्य केलं तर या प्रदेशातील मूल्ये आणि या प्रदेशाची सुरक्षितता कायम राहील असं भारताचं आणि इतर तीन देशांचं मत आहे. (photo tweeted by @indiannavy)
5/10
इंडो-पॅसिफिक प्रदेशातील लोकशाही मूल्ये, स्वातंत्र्यता आणि विकासाच्या मुद्द्यावर हे देश एकत्रित येत आहेत. (photo tweeted by @indiannavy)
6/10
भारताच्या वतीनं या युद्धाभ्यासात INS रणविजय आणि INS सातपुडा तसेच P81 फ्लीट एअरक्राफ्ट सहभागी झालं आहे. (photo tweeted by @indiannavy)
7/10
येत्या काळात क्वॉड देशांची सहमती असेल तर मलबार युद्धाभ्यासामध्ये इतर काही मित्र देशांचाही सहभाग केला जावू शकतो असं अमेरिकेच्या नेव्ही प्रमुखांनी म्हटलं आहे. (photo tweeted by @indiannavy)
8/10
भारतीय नौदलाकडून 2030 सालापर्यंत संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी सहा आण्विक पाणबुड्यांसह 24 नव्या पाणबुड्या खरेदी करण्यात येणार आहे. सध्या भारताकडे 15 परंपरिक पाणबुड्या आणि दोन आण्विक पाणबुड्या आहेत. चीनकडे सध्या 50 पाणबुड्या असल्याचं सांगण्यात येतंय. (photo tweeted by @indiannavy)
9/10
संरक्षण मंत्रालयाने गेल्या महिन्यात 'प्रोजेक्ट-75' नावाच्या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून 75 पाणबुड्या आणि युद्ध नौका निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत, तसेच युद्धनौका संबधी उपकरणांचीही निर्मिती या प्रोजेक्टच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून भारतीय नौदलाची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. (photo tweeted by @indiannavy)
10/10
हिंदी महासागरातील वर्चस्वासाठी चीनने पावले उचलायला सुरुवात केली असून या भागातील अनेक देशांच्या सीमांवर आपले नौदल तैनात केलं आहे. चीनच्या या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांचा प्रयत्न आहे. (photo tweeted by @indiannavy)
Sponsored Links by Taboola