Tips To Keep Family Happy : तुमच्या कुटुंबात सुख-शांती हवी असल्यास, घरातील प्रत्येक सदस्याने अवलंबावा 'हा' मंत्र
घर हे प्रेम, जवळीक आणि आपुलकीचे दुसरे नाव आहे. पण जर या गोष्टी घरातून नाहीशा होऊ लागल्या तर घरातील वातावरण आनंदी राहत नाही. संपूर्ण जगात घर हे एकमेव ठिकाण आहे जिथे आपण दिवसभर काम , प्रवास केल्यानंतर आराम करण्यासाठी परत जातो. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाला आणि घराला सुखी ठेवण्याकरता आपण काय करू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्ही घरी राहूनही ऑफिसच्या कामात व्यस्त असाल तर ते तुमच्या कुटुंबासाठी चांगले नाही. याकरता तुम्ही वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. असे केल्यास तु्म्ही कामाकरता आणि कुटुंबाकरता नीट वेळ देऊ शकाल.
तुमच्या कुटुंबातील कोणीही चांगले काम करत असेल तर त्याची स्तुती नक्कीच करा. विशेषत: तुमच्या मुलांचे चांगले वर्तन आणि सवयींबद्दल त्यांचे भरभरून कौतुक करा.
जर कुटुंबातील पती - पत्नीने एकत्र जेवण बनवले तर त्यांच्यातले प्रेम वाढते. नेहमी सोबत जेवण करायला बसा.
सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत बाहेर फिरायला जा. तसेच एकत्र काहीतरी गेम्स खेळा , बागकाम करा.
कुटुंबाला आनंदी ठेवण्याचा सर्वात महत्वाचा मंत्र म्हणजे त्यांच्या संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे. अशा वेळी तुम्ही त्यांना साथ दिली तर समोरच्या व्यक्तीलाही ते आवडेल. याने घरात आनंद टिकून राहतो.
आनंदी कुटुंबाची ओळख म्हणजे एकमेकांचा आदर करणे. जर तुम्ही एकमेकांचा आदर केला नाही तर सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होतील. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आणि त्यांच्या भावनांचा आदर करा.
अगदी मोठ्या समस्याही बोलून सोडवता येतात. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी बोला. कोणत्याही समस्येचे निराकरण करण्याचा हा सर्वात महत्वाचा आणि सर्वात सोपा मार्ग आहे.
प्रत्येक सण कुटुंबासोबत साजरा करा. यामुळे मुलांना सर्व चालीरीती आणि परंपराही कळतील आणि एकत्र राहण्याचे महत्त्व समजेल.
एकमेकांच्या निर्णयांचा आदर करा आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर तुमचे मत किंवा तुमचे निर्णय लादू नका.