Vastu Tips for Money Plant : घरात मनी प्लांट लावताना ‘या’ चूका कधीच करू नका, नाहीतर होईल मोठे नुकसान
वास्तुशास्त्रात अनेक झाडे घरासाठी शुभ मानली जातात. ही रोपे घरी लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि सुख-समृद्धी येते. मनी प्लांटबद्दल बोलायचे तर, ही एक अशी वनस्पती आहे जी भरपून संपत्ती देऊ शकते. असे मानले जाते की ज्या घरात हे रोप असते त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते. म्हणूनच बरेच लोक ते घरी लावतात. मनी प्लांट घर आणि बाल्कनीचे सौंदर्य देखील वाढवते आणि त्याची देखभाल करणे देखील खूप सोपे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनी प्लांट जरी संपत्तीसाठी फायदेशीर मानला जातो. परंतु वास्तू नियमानुसार त्याची जागा किंवा देखभाल न केल्यास आर्थिक नुकसानही होऊ शकते. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी वास्तुनुसार मनी प्लांट ठेवण्याचे काय नियम आहेत हे जाणून घ्या.
मनी प्लांट सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा मानला जातो. त्यामुळे घराबाहेर कधीही लावू नये. मनी प्लांट नेहमी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतच ठेवावा.
एखादी व्यक्ती कितीही खास असली तरी त्याच्यासोबत मनी प्लांटची देवाणघेवाण करू नका. असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही उत्तर-पूर्व दिशेला ठेवू नये. या दिशेला मनी प्लांट लावल्याने किंवा ठेवल्याने आर्थिक नुकसान होते.
मनी प्लांट लावण्यासाठी आग्नेय दिशा उत्तम मानली जाते. ही दिशा शुभ आहे. कारण ही श्रीगणेशाची दिशा मानली जाते.
तसेच मनी प्लांट नेहमी हिरवागार ठेवावा. मनी प्लांट सुकल्याने काहीतरी अशुभ होऊ शकते.
जर तुमच्या घरी मनी प्लांट असेल तर त्याला वेळोवेळी पाणी देत राहा. जर मनी प्लांट काचेच्या बाटलीत किंवा भांड्यात लावला असेल तर त्याचे पाणी देखील बदलत रहा.
मनी प्लांट प्लास्टिकच्या बाटलीत किंवा भांड्यात लावू नका. मनी प्लांट लावण्यासाठी मातीचे भांडे किंवा काचेच्या वस्तू वापरा.
मनी प्लांट हा एक वेल आहे. लक्षात ठेवा की तो वेल जमिनीला स्पर्श करू नये,