Tips For Car Sickness In Children : कारमधून प्रवास करताना मुलांना उलट्या होतात? 'या' गोष्टी लक्षात ठेवा , तुम्ही आनंदाने प्रवास कराल
अनेकदा मुलांमध्ये ही समस्या पाहायला मिळते की, प्रवास करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागते , मळमळ होते किंवा उलट्या होतात. त्यामुळे ते प्रवासाचा आनंद घेऊ शकत नाहीत. परंतु या समस्येपासून मुलांना मुक्त कसे करायचे हे पालकांना अनेकदा लक्षात येत नाही. त्यावर नेमके उपाय काय हे जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रवासा दरम्यान मळमळ होणे किंवा उलट्या होणे याला याला मोशन सिकनेस किंवा कार सिकनेस असेही म्हणतात. ही समस्या 2 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये अधिक दिसून येते.
मुलांना प्रवास करताना पुस्तक किंवा मोबाईल पाहण्याऐवजी बाहेर पहाण्यास सांगा. असे केल्याने त्रास कमी होईल. प्रवासादरम्यान ते झोपले तर बरे होईल.
प्रवासाच्या आधी मुलांना जास्त खायला देऊ नका. जर लांबचा प्रवास असेल तर त्यांना हलके अन्न द्यावे.
कारमध्ये पुरेशी हवा येऊ द्यावी. यामुळे मुलांना त्रास होणार नाही. तसेच प्रवासात मुलांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, बोला, गाणे लावा. असे केल्याने त्यांना बरे वाटेल.
प्रवास करताना मुलाला अजूनही समस्या येत असल्यास, आपण मुलाच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे पुढील गोष्टी कराव्यात.
थोडेसे आलं कायम सोबत ठेवा. गरज पडल्यास तोंडात ठेवा. दीर्घ श्वास घेण्यास सांगा, यामुळे त्वरित आराम मिळतो. पुदीना आणि लॅव्हेंडरचा सुगंध देखील उलट्या थांबवण्यास मदत करू शकतो.
तुमच्या मुलाला मोशन सिकनेस वाटत असेल तर ताबडतोब गाडी थांबवा आणि त्याला बाहेर फिरायला सांगा. जर खाली उतरणे शक्य नसेल, तर त्याला ताबडतोब पाठीमागे सरकून झोपायला लावा. डोक्यावर ओला रुमाल किंवा टॉवेल ठेवा. अशा प्रकारे मुलाला बरे वाटेल.
प्रवासात काळी मिरी आणि लवंग मुलांना चोखायला द्या. लवंग उलट्या थांबवण्यासही मदत करते.
प्रवास करताना बरेच लोक गाडी पूर्ण थंड करून घेतात. यामुळे मुलांना तहान लागत नाही आणि डिहायड्रेशन होते. त्यामुळे मोशन सिकनेस होऊ लागतो. अशा परिस्थितीत गरज असेल त्याच वेळी गाडीत एसी लावा.