Tips For Solo Trips : सोलो ट्रिप करताय? फाॅलो करा 'या' काही साध्या आणि सोप्या टिप्स
अनेकदा महिला सोलो ट्रिपच्या नावाने गोंधळून जातात. त्यांना अनेक गोष्टींबद्दल समस्या येऊ लागतात, जसे की त्यांचे सामान एकट्याने कसे घेऊन जावे, जेवण आणि राहण्याची व्यवस्था सुरक्षित असेल की नाही, आजारी पडल्यास काय होईल.अशा वेळी काही टिप्स तुमच्या कामी येऊ शकतात पाहा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही कुठेतरी प्रवास करण्याचा विचार कराल तेव्हा प्रथम त्या ठिकाणची माहिती मिळवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, जवळचे रेल्वे स्टेशन, विमानतळ, रस्ता मार्ग, हॉटेल, भोजन व्यवस्था, बाजार, पोलीस स्टेशन, प्रसिद्ध ठिकाणे इ. असे केल्याने तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करु शकाल.
प्रवासादरम्यान, तुम्ही मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, तिकीट, इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे तुमच्यासोबत ठेवावीत. स्वत:चे दोन फोटो देखील सोबत ठेवावेत.
तुम्ही एकटे जात असाल, तर वेळोवेळी तुमचे लोकेशन शेअर करत राहावा. सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप उपयुक्त ठरेल. नेटवर्क कुठेही उपलब्ध नसले तरी तुमच्या कुटुंबातील सदस्यांना काळजी होणार नाही आणि तुम्ही कुठे आहात हे त्यांना कळेल.
प्रवासादरम्यान तुमची प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने औषधे सोबत ठेवा. अशा परिस्थितीत ही औषधे उपयुक्त ठरतील. पोटदुखी, लूज मोशन, गॅस, पेन किलर, ताप इत्यादीसाठी औषधे सोबत ठेवा.
बहुतेक व्यवहार आता कॅशलेस झाले असले तरी तरीही तुमच्याकडे रोख रक्कम ठेवा. याचा वापर तुम्ही स्थानिक बाजारात किंवा लहान वस्तू खरेदी करण्यासाठी करु शकता.
दिवसाच्या वेळी स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न करा. रात्रीपेक्षा दिवसा पोहोचणे अधिक आरामदायक आणि सुरक्षित आहे.
मनमोकळे वागणे खूप चांगले आहे. मात्र अनोळखी लोकांशी संवाद साधू नये. तसेच कोणाशीही वैयक्तिक माहिती शेअर करु नये.
एकट्याने प्रवास करताना, खाजगीऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार नाही. तसेच कोणाशीही हँग आउट करण्यापूर्वी, पार्टीला जाण्यापूर्वी किंवा एकत्र राहण्यापूर्वी अनेक वेळा विचार करा आणि शक्य असल्यास ते टाळा.
संध्याकाळच्या वेळी अशा ठिकाणी एकटे जाऊ नका जिथे खूप शांतता आहे. समुद्रकिनाऱ्यावर एकटे फिरु नका.