Tea or Chai : चहाप्रेमींनो, हे वाचा! 'चाय' हे चिनी नाव, मग याचं खरं नाव काय माहितीय?
Chai or Tea Original Name : भारतात अनेक जण चहाचे शौकीन आहेत. भारतातील अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात.
Chai or Tea Original Name
1/10
अनेकांच्या दिवसाची सुरुवातच चहाने होते, तर काही जण दिवसातून अनेक वेळा चहा पितात. पण तुम्हाला माहित आहे का की चहा हा शब्द आणि नाव भारतातील नाही.
2/10
चहा (Tea) हा शब्द मूळ चिनी भाषेतून घेतला आहे. चीनचा राजा शेंग नंग या चहाच्या पेयाचे नाव चा-ए असं ठेवलं. त्याचा अपभ्रंश होऊन हे पेय चाय (Chai), चहा या शब्दांनी ओळखलं जाऊ लागलं, असं म्हटलं जातं.
3/10
चाय आणि चा हे दोन्ही चिनी शब्द आहेत. 'टी' (Tea) हा इंग्रजी शब्द मिन चायनीज या चीनच्या दुसर्या भाषेतून आला आहे, असंही म्हटलं जातं, जिथे त्याचे स्पेलिंग te किंवा tī असं आहे.
4/10
पोर्तुगीजांनी पहिल्यांदा चिनी लोकांकडून चहा विकत घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी मकाओ बंदरातून व्यापार केला. जेथे चहासाठी मँडरीन शब्द स्थानिकपणे बोलल्या जाणार्या कँटोनीजमध्ये 'चआ' असा होता.
5/10
चहा या नावाचे मूळ चिनी भाषेत आहे. चिनी भाषेत चहाला छा म्हणतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अशीच नावे असल्याचे दिसते.
6/10
इंग्रजी आणि काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या या नावाशी साधर्म्य असलेलं 'टी' (Tea) हे नाव प्रचलित आहे.
7/10
आता प्रश्न असा आहे की, चहाचं मूळ नाव काय? तर याचं कोणतंही अचूक उत्तर नाही आणि त्याच्या निर्मितीवर आधारित अनेक नावांनी हे पेय ओळखलं जातं.
8/10
चहासाठी उष्णोदक आणि 'दुग्ध जल मिश्रित शर्करा युक्त पर्वतीय बूटी' अशी काही हिंदी भाषेतील नावे अशी आहेत.
9/10
'दुग्ध जल मिश्रित शर्करा युक्त पर्वतीय बूटी' याचा अर्थ दुध आणि साखर, पाणी मिसळलेले पर्वतीय बूटी असा होतो.
10/10
अनेक तज्ज्ञ म्हणतात की, त्याचे हिंदी नाव चाय आहे. मराठी भाषेत चहा या नावाने हे प्रचलित आहे.
Published at : 22 Dec 2023 09:04 AM (IST)