साक्षी मलिक ढसाढसा रडली, कुस्तीही सोडली!
दोन्ही कुस्तीपटूंनी कुस्तीला रामराम ठोकण्याची घोषणा केली. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याच समर्थकाची नियुक्ती झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय सिंह (Sanjay Singh) हे कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. मात्र ज्या बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत, तब्बल 40 दिवस दिल्लीत आंदोलन करुनही, त्यांच्याच माणसाची नियुक्ती महासंघाच्या अध्यक्षपदी विराजमान होत असेल, तर कुस्तीला रामराम ठोकलेला बरा, असं म्हणत साक्षी मलिक ढसाढसा रडली.
आम्ही जिंकू शकलो नाही. पूर्ण भावनेने आम्ही लढाई लढलो. पण महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषणसारख्या व्यक्ती, त्यांचा सहकारी जिंकून येत असेल, तर मी माझ्या कुस्तीचा त्याग करते, यापुढे मी कुस्तीच्या मैदानात दिसणार नाही. देशवासियांना धन्यवाद!, असं साक्षी मलिक म्हणाली.
साक्षी मलिकने महिला कुस्ती स्पर्धेत भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं होतं. साक्षीने 2016 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. तर विनेश फोगट ही सुद्धा पदक विजेती कुस्तीपटू आहे. विनेशने कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पर्धा या दोन्ही स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं होतं. असा पराक्रम गाजवणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.