दह्यात साखर योग्य की मीठ? कशासोबत खावे जाणून घेऊया योग्य पर्याय..
दही हे अतिशय आरोग्यदायी अन्न आहे. दही हे प्रोबायोटिक अन्न आहे, त्यामुळे दह्याचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक प्रथिने मिळतात, तर आतड्यांमध्ये निरोगी बॅक्टेरिया मिळतात जे आतड्याच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याच बरोबर दही नीट खाल्ले नाही तर त्याचे फायदे शरीराला मिळत नाहीत. दह्यासोबत अनेकदा साखर किंवा मीठ सेवन केले जाते.
दह्यात साखर घालून खाल्ल्यास दह्याचा आंबटपणा कमी होतो, अशा स्थितीत दही खाणे सोपे जाते. दह्यात साखर मिसळल्याने दह्याची चव वाढते.
विशेषतः मुलांना साखर मि सळून दही खायला आवडते.
ज्या लोकांना झटपट एनर्जी लागते ते दही साखर मिसळून खाऊ शकतात. पण दह्यामध्ये साखर घातल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढते.
साखरयुक्त दही खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते.
रोज साखर मिसळून दही खाल्ल्यास वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो. जास्त साखर सामग्री असलेले दही खाल्ल्याने मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो.
दह्यात मीठ घातल्याने त्याची चव वाढते. जे लोक जास्त तीव्रतेचे वर्कआउट करतात त्यांच्या घामाने इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात, म्हणून त्यांनी मीठ मिसळून दही खावे. पण जास्त प्रमाणात मीठ मिसळून दही खाल्ल्याने बीपी आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.
निरोगी राहायचे असेल तर दही साधे खावे. मीठ आणि साखर मिसळून दही खाल्ल्याने चव बदलते पण ते आपल्या आरोग्यासाठी तितकेसे चांगले नसते.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )pc: unplash