Ratan Tata Motivational Thoughts : रतन टाटांचे 'हे' अनमोल विचार तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करतील; जाणून घ्या कोणते आहेत ते विचार
देशातील सर्वात मोठे उद्योगपती रतन टाटा यांना कोण ओळखत नाही? रतन टाटा हे उद्योग आणि व्यवसाय जगतात एक प्रसिद्ध नाव आहे. (Photo Credit : Ratan Tata Facebook)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता आणि यावेळी ते त्यांचा 86 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.(Photo Credit : Ratan Tata Facebook)
रतन टाटा हे एक यशस्वी उद्योगपती असण्यासोबतच एक गुंतवणूकदार आणि चांगल्या मनाचे व्यक्ती देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या कामासोबतच लोक त्यांच्या व्यक्तिमत्त्वानेही प्रभावित झाले आहेत. कारण रतन टाटा यांनी संघर्षातून यशाचा प्रवास केलाय. तसेच ते एक यशस्वी उद्योजक देखील आहेत. (Photo Credit : Ratan Tata Facebook)
रतन टाटा यांचे आदर्श, विचार आणि तत्त्वे नवीन आणि तरुण पिढीला जीवनाची दिशा देतात. तसेच, त्याचे विचार यश मिळविण्यासाठी व मनोबल वाढवण्यास मदत करतात. (Photo Credit : Ratan Tata Facebook)
जाणून घ्या रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार, जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यास, यशस्वी होण्यास आणि यशाचा तसेच तुमच्या ध्येयायचा मार्ग गाठण्यास मदत करतील. (Photo Credit : Ratan Tata Facebook)
आयुष्यात पुढे जाण्यासाठी चढ-उतार खूप महत्वाचे असतात. कारण ईसीजीमध्ये जर आपण पहिले तर सरळ रेषा म्हणजे आपले जीवन संपले. (Photo Credit : Ratan Tata Facebook)
चूक फक्त तुमची आहे, तुमचे अपयश फक्त तुमचे आहे, त्यासाठी कोणाला दोष देऊ नका. तुमच्या चुकीपासून शिका आणि आयुष्यात पुढे चालत राहा.(Photo Credit : Ratan Tata Facebook)
तुमच्या मित्रांना कधीही चिडवू नका जे चांगले अभ्यास करतात आणि मेहनत करतात. एक वेळ अशी येईल की, तुम्हालाही त्याच्या हाताखाली काम करावे लागेल.(Photo Credit : Ratan Tata Facebook)
आपण माणसं आहोत, कॉम्प्युटर नाही, त्यामुळे आयुष्याचा आनंद घ्या, नेहमी गंभीर करू नका. तसेच जर लोकांनी तुमच्यावर दगडफेक केली तर त्या दगडांचा वापर तुमचा महाल बांधण्यासाठी करा.(Photo Credit : Ratan Tata Facebook)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Ratan Tata Facebook)