Dark Circle : डोळ्याखालील डार्क सर्कल घालवायचे आहेत, हे उपाय करा!
आजकाल वाढता ताण, तासनतास कॉम्प्युटरवर काम करणे आणि जेवणात पोषणाचा अभाव यांमुळे लोकांच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल अर्थातच काळी वर्तुळे येऊ लागली आहेत . [Photo Credit : Pixel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपूर्वी वाढत्या वयाबरोबरच लोकांना ही समस्या भेडसावत असे, मात्र आता तरुणांच्या डोळ्यांखालीही काळे वर्तुळ दिसू लागले आहेत .डार्क सर्कल कोणालाही होऊ शकतात . चेहऱ्याच्या सौंदर्यावर हे डाग कमी नाहीत . [Photo Credit : Pixel.com]
बाजारात अनेक क्रीम आणि सीरम उपलब्ध आहेत जे डार्क सर्कल कमी करण्याचा दावा करतात. तथापि, ही रसायने असलेल्या उत्पादनांमध्ये फायद्यांपेक्षा अधिक दुष्परिणाम होतात . अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात मिळणाऱ्या काही भाज्यांचा वापर करून तुम्ही सहजपणे डार्क सर्कल कमी करू शकता . [Photo Credit : Pixel.com]
डोळ्यांखाली डार्क सर्कल का होतात : जास्त ताण घेणे,कधीकधी झोपेसारख्या समस्यां, हार्मोनल बदल अशा कारणांमुळे काळी वर्तुळे होतात. जर तुम्ही निरोगी जीवनशैली जगली नाही तर तुम्हाला डोळ्याखाली डार्क सर्कल येऊ शकतात . आनुवंशिकता हे देखील कारण असू शकते . [Photo Credit : Pixel.com]
डार्क सर्कल दूर करण्यासाठी घरगुती उपाय संत्री : तुम्ही संत्र्याची साल देखील वापरू शकता. संत्र्याची साले वाळवून बारीक करून घ्या . या पावडरमध्ये गुलाबजल मिसळून डार्क सर्कल वर लावा . यामुळे डार्क सर्कल सहज दूर होतील .[Photo Credit : Pixel.com]
बटाटा : बटाटा देखील डार्क सर्कल दूर करण्यासाठी प्रभावी ठरतो . यासाठी बटाट्याच्या रसात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा आणि कापसाने डोळ्यांखाली लावा . असे केल्याने तुमची डार्क सर्कल निघून जातील . [Photo Credit : Pixel.com]
टोमॅटो - टोमॅटो प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असतो . टोमॅटोचा हंगाम वर्षभर असतो . डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी करण्यासाठी टोमॅटोचा वापर करा . टोमॅटो नैसर्गिक पद्धतीने डार्क सर्कल दूर करण्याचे काम करते. टोमॅटो त्वचेवर लावल्याने त्वचा मुलायम आणि टवटवीत होते . [Photo Credit : Pixel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pixel.com]