Health Benefits For drinking hot water in winter : हिवाळ्यात रिकाम्या पोटी किती गरम पाणी प्यावे? जाणून घ्या संबंधी सविस्तर माहिती
Health Benefits For drinking hot water in winter : हिवाळ्यात रिकाम्या पोटी किती गरम पाणी प्यावे? जाणून घ्या संबंधी सविस्तर माहिती
Health Benefits For drinking hot water in winter
1/10
रिकाम्या पोटी पाणी प्यावे, असे आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर यांच्याकडून तुम्ही अनेकदा ऐकले असेल, यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळते. असेही सांगितले जाते. (Photo Credit : Pixabay)
2/10
आता प्रश्न पडतो की, रिकाम्या पोटी गरम, कोमट की थंड पाणी प्यावे? ऋतुमानानुसार आहारातही बदल करायला हवा. हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी जास्त गरम गोष्टी खाल्ल्या जातात. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी थंड पदार्थ खाल्ले जातात. (Photo Credit : Pixabay)
3/10
तसेच, बरेच लोक प्रत्येक हंगामात रिकाम्या पोटी कोमट किंवा गरम पाणी पितात. थंड हवामानात, आपण गरम पदार्थ खावे जेणेकरुन आपण निरोगी राहाल आणि आपले शरीर दिवसभर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल. (Photo Credit : Pixabay)
4/10
हिवाळ्यात थंड पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर चांगला परिणाम होतो. हिवाळ्यात सकाळी किती गरम पाणी पिणे आवश्यक आहे? जाणून घ्या हिवाळ्यात सकाळी किती प्रमाणात गरम पाणी पिणे योग्य आहे. (Photo Credit : Pixabay)
5/10
तज्ञांच्या मते, कोणत्याही व्यक्तीने सकाळी त्याच्या शरीरातील उष्णतेनुसार कोमट पाणी प्यावे. कारण खूप थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असू शकते. त्याचप्रमाणे खूप गरम पाणी देखील शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे थंडीतही कोमट पाणी प्यावे. ज्याचे तापमान 60°F ते 100°F (16°C ते 38°C) च्या आत असावे. (Photo Credit : Pixabay)
6/10
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल तर, असे पाणी प्यावे जमुळे तुमचा खोकला बारा होण्यास मदत होईल आणि तुमच्या घशालाही अराम मिळेल. (Photo Credit : Pixabay)
7/10
खूप गरम किंवा खूप थंड पाणी पिणे टाळावे. योग्य तापमानानुसार कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण साफ होण्यास मदत होते. (Photo Credit : Pixabay)
8/10
थंडीत पित्ताचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे छातीत जळजळ, अपचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीचा होऊ शकते. तसेच या त्रासामुळे झोप न लागल्याने त्वचेवर पुरळ येऊ शकतात. जर तुम्हालाही अशा समस्येचा सामना करावा लागत असेल तर, तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल. (Photo Credit : Pixabay)
9/10
आयुर्वेदानुसार सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिऊ नये. जर तुम्हाला प्यायचे असेल तर कोमट पाण्यात लिंबू, तूप किंवा मध मिसळून प्यावे. यामुळे तुमच्या पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. (Photo Credit : Pixabay)
10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)
Published at : 27 Dec 2023 04:11 PM (IST)