Strawberry Benefits : लालबुंद स्ट्रॉबेरी खाण्याने मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
आपल्या आजूबाजूला अशी अनेक साधी फळे आहेत, जी खायला चविष्ट असतात आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. स्ट्रॉबेरी हे देखील असेच एक फळ आहे. त्याची चव गोड आणि आंबट असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाचा वापर अनेक गोष्टींमध्ये केला जातो. जसे की, शेक, केक, चॉकलेट इत्यादी. हे पदार्थ तितकेसे आरोग्यदायी नसले तरी ताजी स्ट्रॉबेरी चवीबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.
स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल गुणधर्म भरपूर असतात, जे अनेक आरोग्य समस्या दूर करण्यात प्रभावी ठरू शकतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी वजन कमी करण्यास आणि कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते.
व्हिटॅमिन सीने युक्त स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हे तुम्हाला इन्फेक्शनपासूनही दूर ठेवते. स्ट्रॉबेरीचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही दिवसातून एक कप स्ट्रॉबेरीचे सेवन करू शकता. हिवाळ्यात हे खाणे जास्त फायदेशीर आहे.
हृदयविकाराची दोन सर्वात मोठी कारणे म्हणजे तणाव आणि जळजळ. या दोन्हींपासून संरक्षण करण्यासाठी स्ट्रॉबेरी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. स्ट्रॉबेरीमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉलपासून संरक्षण करतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होण्यापासून बचाव होतो.
स्ट्रॉबेरीचे सेवन मधुमेहामध्ये देखील फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरीचा ग्लायसेमिक इंडेक्स 40 असतो, जो खूपच कमी असतो. याचा सरळ अर्थ असा आहे की मधुमेही रुग्ण कोणतीही काळजी न करता ते खाऊ शकतात. याशिवाय स्ट्रॉबेरी नियमित खाल्ल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोकाही कमी होतो.
शरीराचे वाढते वजन कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी प्रभावी आहे. स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीज कमी असतात. फायबर युक्त स्ट्रॉबेरी खाल्ल्यानंतर तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. त्यात आढळणारे व्हिटॅमिन सी तुमची चयापचय गती वाढवू शकते, ज्यामुळे शरीर कॅलरी जलद बर्न करते.
स्ट्रॉबेरी कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी प्रभावी मानली जाते. स्ट्रॉबेरीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स कर्करोगापासून बचाव करतात. याव्यतिरिक्त, स्ट्रॉबेरीमध्ये ल्युटीन आणि झीथेनासिन्स सारखे अँटिऑक्सिडेंट असतात, जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतात.
स्ट्रॉबेरी फायबरचा चांगला स्रोत असल्याचे आढळून येते. याचे सेवन पचनासाठी रामबाण उपाय मानले जाते. स्ट्रॉबेरी बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरू शकते.
स्ट्रॉबेरीमधील ताजेपणा आणि व्हिटॅमिन सी पोट साफ करण्यास मदत करते. हे फळ खाल्ल्याने आतड्यांना आराम मिळतो. गॅस आणि अॅसिडिटीसाठी हा सर्वोत्तम उपचार मानला जातो.