World Vegetarian Day 2023 : आज 'जागतिक शाकाहारी दिना'च्या दिवशी, शाकाहारी असण्याचे फायदे काय आहेत? पाहा
आज 'जागतिक शाकाहारी दिवस' साजरा केला जात आहे. शाकाहाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शाकाहारी जीवनशैलीचे आरोग्य आणि मानवी फायद्यांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी 'जागतिक शाकाहारी दिन' साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाकाहारी आहार म्हणजे काय - शाकाहारी आहारात मांस, मासे, सीफूड इत्यादींचा समावेश नसून दुग्धजन्य पदार्थ, फळे, कडधान्ये, हिरव्या भाज्या, ड्रायफ्रुट्स हे खाल्ले जाते.
शाकाहारी आहारात मांस आणि मासे यांचा समावेश नाही, त्यामुळे तुम्ही कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून दूर राहू शकता. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहत असल्याकारणाने लठ्ठपणा आणि हृदयविकारापासून तुम्ही दूर राहता.
शाकाहारी अन्न देखील अनेक प्रकारे हृदयाचे आरोग्य वाढवते. शाकाहारी पदार्थांमध्ये फायबर कमी प्रमाणात असल्याने हृदय निरोगी राहते. शाकाहारी आहार घेतल्यास रक्तदाब, हृदयविकार आणि उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो.
शाकाहारी आहार घेतल्यास वयात आल्यावर होणाऱ्या टाईप-2 मधुमेह होण्याचा धोका बर्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
शाकाहारी आहार घेतल्याने मेंदू निरोगी राहतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की अधिक पालेभाज्यांचे सेवन केल्याने स्मृतिभ्रंश, अल्झायमर हे आजार दूर राहण्यास मदत होते.
इतकेच नाही तर शाकाहारी राहिल्याने कर्करोग होण्याचा धोका कमी असतो. शाकाहारी आहारात भरपूर पोषक, जीवनसत्त्वे आणि प्रथिने देखील असतात, जे शरीराला निरोगी आणि मजबूत ठेवतात.
शाकाहारी अन्नामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या कमी होतात.
शाकाहारी आहारात तुम्ही जर भोपळा, रताळे, काकडी , मुळा , बटाटा या पदार्थांचे सेवन सालीसकट केले तर तुमच्या शरीराकरता ते खूप फायदेशीर ठरू शकते