Vastu Tips For Exam Preparation : 'या' नियमांसह परीक्षेची करा तयारी, तुम्हाला मिळतील चांगले गुण
परीक्षेत चांगले गुण मिळवणे हे सर्व विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. शिवाय, आपल्या मुलांनी परीक्षेत चांगले गुण मिळवून यश संपादन करावे, अशीही पालकांची इच्छा असते. त्यामुळे परीक्षा सुरू होण्याआधीच मुलं तयारीत व्यस्त असतात आणि पालकही मुलांच्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरंतु अनेकवेळा असे घडते की, परिश्रम करूनही परीक्षेत अपेक्षित गुण मिळत नाहीत, तर काहींना अभ्यास करावासा वाटत नाही आणि त्यांना त्यासाठी चांगली तयारी करता येत नाही. जर तुमच्यासोबत असे होत असेल तर त्याचे एक कारण वास्तुदोष असू शकते. यासाठी तुम्ही वास्तुशास्त्रात सांगितलेले नियम आणि उपाय पाळू शकता. या नियमांनुसार परीक्षेची तयारी केल्यास परीक्षेत नक्कीच यश मिळेल.
चुकीच्या दिशेला बसून अभ्यास केल्याने मुले लवकर विसरायला लागतात किंवा त्यांची अभ्यासात एकाग्रता कमी होते आणि त्यांचे मन अभ्यासात गुंतत नाही. त्यामुळे वास्तुशास्त्रात अभ्यासाची दिशा स्पष्ट केली आहे.
यानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आपले तोंड नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवावे. वास्तुशास्त्रानुसार, या दिशांमधून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि म्हणूनच, या दिशेला तोंड करून अभ्यास केल्याने मुलाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
काही लोक प्रकाश किंवा हवेसाठी खिडक्या आणि दाराजवळ बसून अभ्यास करू लागतात. पण लक्षात ठेवा की मुलांना कधीही खिडकी किंवा दरवाजासमोर बसून अभ्यास करू देऊ नये.
या ठिकाणी बसून अभ्यास केल्याने मुलांचे मन अभ्यासापासून विचलित होते. कारण मुलांचे लक्ष फक्त दार आणि खिडक्यांच्या बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांवर किंवा दृश्यांवर केंद्रित असते.
मुलांचे मन चंचल असते, त्यामुळे त्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होणे सामान्य आहे. मुलांचे मन अभ्यासात विचलित होत असेल तर पालकांनी मुलांना अभ्यासापूर्वी ध्यान करायला लावावे.
अभ्यास सुरू करण्यापूर्वी, उत्तरेकडे तोंड करून आणि काही मिनिटे ध्यान केल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात मदत होते.
घरातील लोक अनेकदा अभ्यास करण्यासाठी सकाळी लवकर उठण्याविषयी बोलतात. वास्तु आणि ज्योतिष शास्त्रानुसार ब्रह्म मुहूर्त अभ्यासासाठी सर्वोत्तम मानला जातो. पहाटे 4 ते 5.30 या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात.
ही अशी वेळ असते जेव्हा वातावरण सर्वात शुद्ध असते आणि म्हणूनच या काळात तुमचे मन देखील ताजे राहते. एखाद्या व्यक्तीची मेमरी सिस्टीम सकाळी चांगले काम करते असेही म्हटले जाते. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर जागून अभ्यास करा. या काळात वाचलेल्या गोष्टी चांगल्या लक्षात राहतात.