PHOTO : जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया साईट आणि त्यांचा रंजक इतिहास
व्हॉट्सॲपची निर्मिती 2009 साली ब्रायन ॲक्टन आणि जॅन कोम या दोन अमेरिकन व्यक्तींनी केली. कॅलिफोर्नियाच्या माउंटन व्ह्यू या शहरामध्ये मुख्यालय असलेल्या व्हॉट्सॲपला 2014 साली फेसबुक कंपनीने विकत घेतले. जगातील सर्वाधिक वापरात असलेले समाज माध्यम म्हणून व्हॉट्सॲप ओळखला जातो. नवनवीन आणि आकर्षक फीचर्स देत युजर्सना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न व्हॉट्सॲपकडून सातत्याने केला जातो. (photo courtesy : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफेसबुक जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया साईट म्हणून प्रचलित आहे. 2004 साली फेसबुकची स्थापना झाली. मार्क झुकरबर्ग यांनी डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस या वर्गमित्रांसोबत हार्वर्ड विद्यापीठात असताना फेसबुकची स्थापना केली होती. फेसबुक हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. (photo courtesy : pixabay)
ट्विटरवर मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचा वापर हा प्रामुख्याने महत्त्वाच्या गोष्टी ट्विट करण्यासाठी केला जातो. 2006 मध्ये इव्हान विल्यम्स (Evan Williams) आणि बिझ स्टोन (Biz Stone) यांनी ही सेवा तयार केली. ट्विटरवर आपल्याला जगभरातील महत्त्वाच्या व्यक्तींना फॉलो करता येतं. ट्विटरमुळे राजकीय आणि सामाजिक विषयांबद्दल जागरूकता वाढते, राजकीय संदेश देता येतो. ट्विटरमुळे समाजाचे मत जाणून घेता येते. (photo courtesy : pixabay)
सोशल मीडियात फोटो, मिम्स, स्टेट्स, व्हिडीओ यांच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणाऱ्या इंस्टाग्रामचा जगभरात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इंस्टाग्राम कायमच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इंस्टाग्रामची सर्वप्रथम सुरुवात 2010 मध्ये केविन शिस्ट्रोम आणि मॅक क्रीगर या दोघांनी मिळून केली होती. सुरुवातीला इंस्टाग्रामचे नाव बर्बन असे होते. परंतु पुढे याचे नाव इंस्टाग्राम असे झाले. (photo courtesy : pixabay)
स्नॅपचॅटची सुरुवात 2011 मध्ये सुरू झाली. 'स्नॅपचॅट' या मोबाइल मेसेंजर अॅपची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. फेसबुक, युट्युबला तोडीसतोड स्पर्धा देत आहे. तरुणाईमध्ये हे लोकप्रिय अॅप आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील तीन माजी विद्यार्थीयांनी एकत्र येत 8 जुलै 2011 रोजी आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर स्नॅपचॅटची निर्मिती केली. (photo courtesy : pixabay)