PHOTO : वय 47, शरीरयष्टी विशीतल्या तरुणांना लाजवणारी; हृतिकच्या टोण्ड बॉडीवर चाहते घायाळ
अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) खराखुरा बॉलिवूडचा ग्रीक गॉड आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वयाच्या 47 वर्षीही त्याचा फिटनेस तरुणांना लाजवेल असा आहे. (photo courtesy : @hrxbrand instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहृतिकचा एक फोटो आणि व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये त्याची टोण्ड बॉडी पाहून चाहते आणि सेलिब्रिटी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (photo courtesy : @hrxbrand instagram)
परंतु हृतिकची घटस्फोटित पत्नी सुझान खानलाही त्याच्या फोटोवर कमेंट करण्यापासून राहावलं नाही. तू एकविशीचा दिसतोस, अशी कमेंट सुझानने केली आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्याच कमेंटवर जात आहेत. (photo courtesy : @sussannekroshan twitter)
हतिक सध्या त्याच्या HRX ब्रॅण्डचं प्रमोशन करत आहे. या ब्रॅण्डच्या प्रमोशनचा फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (photo courtesy : @hrxbrand instagram)
फिटनेस फ्रिक हृतिकची शरीरयष्टी पाहून सगळेच आश्चर्यचकित आहेत. त्याचा शर्टलेस लूक पाहून सगळेच घायाळ झाले आहेत. (photo courtesy : @hrxbrand instagram)
गळ्यात स्कार्फ, ब्लॅक कॅप आणि सनग्लासेसमधली हृतिकला केवळ तरुणींच्याच काळजाचा ठोका चुकला असेल असं नाही तर तरुणांनही त्याचा हेवा वाटत असेल. (photo courtesy : @hrxbrand instagram)
त्याचे बायसेप्स आणि अॅब्ज पाहून आपल्यालाही असं शरीर कमवायला हवं, अशी इच्छा अनेकांच्या मनात निर्माण झाली असावी.(photo courtesy : @hrxbrand instagram)