Skin Care Tips: त्वचेचा काळपटपणा घालवायचाय? तर घरच्या घरी तयार करा 'हे' फेस पॅक!
बेसन फेसपॅक: एका बाऊलमध्ये बेसन घ्या. त्यामध्ये थोडी हळद, एक चमचा ओलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस टाका. हे सर्व नीट मिक्स करून चेहऱ्याला लावा, 15 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील टॅन निघून जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुलतानी मातीचा फेसपॅक: मुलतानी माती गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला फेसपॅक म्हणून लावू शकता. या पॅकमुळे तुमच्या स्किनवर ग्लो येतो आणि चेहऱ्याचा तेलकटपणा देखील कमी होतो.
मध फेसपॅक: मधामध्ये दही मिक्स करून फेसपॅक तयार करा. हा पॅक आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.
टॉमॅटो फेसपॅक: टॉमॅटो मिक्सरमध्ये मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. हा टोमॅटोच्या पेस्टचा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनंतर चेहरा धुवा. आठवड्यातून दोन वेळा टोमॅटो चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील काळपटपणा कमी होतो. तसेच चेहऱ्यावर ग्लो देखील येतो.
हळद फेसपॅक: चेहऱ्यावर हळद आणि गुलाब पाणी मिक्स करून लावल्याने देखील चेहऱ्यावर ग्लो येतो.