Skin Care: त्वचेसाठी व्हिटॅमिन ई फार उपयुक्त; जाणून घ्या 'हे' 6 आश्चर्यकारक फायदे
व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जे त्वचेचे प्रदूषण, अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. व्हिटॅमिन ई वापरल्यास तुमच्या त्वचेवर चमक येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्हिटॅमिन ईमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत जे त्वचेला हायड्रेशन आणि आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.
व्हिटॅमिन ईमुळे त्वचेवरील जखम लवकर बरी होते. त्वचेवरील पुरळ कमी होतात, त्वचा गुळगुळीत आणि मुलायम होते.
व्हिटॅमिन ई सनबर्नची लक्षणं कमी करण्यास, त्वचेचा लालसरपणा कमी करण्यास आणि त्वचेला शांत करण्यास मदत करते.
व्हिटॅमिन ईमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे जळजळ होत असलेल्या त्वचेला शांत करण्यास मदत करतात. त्वचेवरील लालसरपणा, सूज कमी करण्यास व्हिटॅमिन ई मदत करते. व्हिटॅमिन ई वृद्धत्वाच्या लक्षणांचा देखील सामना करते.
असामान्य त्वचा टोन (Uneven skin tone), काळे डाग आणि हायपरपिग्मेंटेशनमुळे त्वचा निस्तेज दिसू शकते. व्हिटॅमिन ई काळे डाग हलके करण्यास मदत करते आणि त्वचेचा रंग एकसमान बनवते, त्वचा उजळण्यास याची मदत होते.