Signs of Depression : घरातील वयस्कर लोक प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करतात का? असू शकते नैराश्याचे लक्षणं
वृद्धांमध्ये तणाव ही एक सामान्य समस्या आहे, वयोमानानुसार त्यांच्यात अनेक गोष्टी बदलतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयांना अनेक कारणांमुळे नैराश्य येऊ शकते. वृद्ध लोकांसाठी नैराश्य ओळखणे कठीण होते. पाहूयात नैराश्याची लक्षणं.
नैराश्याने ग्रासलेल्या ज्येष्ठांना अनेकदा विलक्षण चिंता वाटते आणि ते कधीही अचानकच खूप शांत होतात. यामुळे ते अनेक आजारांना सामोरे जातात.
वृद्ध लोक ज्यांना पुरेशी झोप मिळत नाही, खूप लवकर जाग येते ते लोक नैराश्याला सामोरे जातात. यामुळे त्यांना निद्रानाश होतो.
घरातील वृद्ध सतत चिडचिड करत असतील तर ते नैराश्याचे लक्षणं असू शकते.
भूक न लागणे हे वृद्ध लोकांमध्ये नैराश्याचे लक्षण असू शकते. ते खाण्यास नकार देतात किंवा अन्न खात नाहीत तर त्यांची आपुलकीने चौकशी करावी.
सतत जास्त खाणे आणि वजन वाढणे ही देखील नैराश्याची लक्षणे असू शकतात.
तसेच ते घरातल्या इतर लोकांसोबत मिसळत नाहीत. त्यांना एकटेच रहावसं वाटत.
जीवनातील एखादी दु:खद घटना सतत आठवत राहते. ते त्याच घटनेचा अति प्रमाणात विचार करत राहतात.
वृद्ध लोकांच्या मनात सतत नकारात्मक विचार येतात. यामुळे त्यांच्या झोपेचा पॅटर्न बदलतो.