Ayurvedic Treatments : मुलांना पोटदुखीपासून लगेच आराम मिळेल, फक्त 'हे' आयुर्वेदिक उपाय करून पाहा
पोटदुखी ही सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. लहान मुलांना हा आजार अनेकदा होतो. मात्र आयुर्वेदानुसार लहान मुलांच्या पोटदुखीवरही उपचार करता येतात. जे पोटाच्या समस्या आणि वेदना कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजास्त खाणे, अपचन, गॅस, संसर्ग किंवा एखाद्या गोष्टीची ऍलर्जी अशा अनेक कारणांमुळे मुलांना पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. पोटाच्या या समस्यांमुळे तुमच्या मुलाला अस्वस्थ वाटू शकते.
आले त्याच्या पाचक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. आल्याचा रस आणि मध यांचे साधे मिश्रण पोटातील अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकते. अर्धा चमचा आल्याच्या रसात एक चमचा मध मिसळून मुलाला द्या. हे नैसर्गिक मिश्रण पचनास मदत करते आणि पोटदुखीपासून आराम देते.
ओव्यात अनेक चांगले गुणधर्म असतात. जे गॅस आणि अपचन दूर करण्यास मदत करतात, एक चमचा ओवा एक कप पाण्यात उकळवा, गाळून घ्या आणि थंड होऊ द्या. पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
आणखी एक आयुर्वेदिक घटक जो आराम देण्यास मदत करू शकतो ते म्हणजे बडिशेप. कारण ते पचनास मदत करतात आणि जळजळ कमी करतात. एक चमचा बडीशेप भाजून थंड होऊ द्या. त्यांना हलकेच भाजून घ्या आणि कोमट पाण्यासोबत लहान मुलांना खायला द्या.
हिंगामध्ये अँटिस्पास्मोडिक गुणधर्म असतात जे पोटाच्या दुखण्यापासून आराम देतात. एक चमचा कोमट पाण्यात चिमूटभर हिंग मिसळा आणि बाळाच्या नाभीभोवती लावा. यामुळे अस्वस्थता कमी होण्यास मदत होऊ शकते.
पुदिन्याची पानं शरीराला थंडावा देतात. ज्यामुळे पोटाचा त्रास कमी होतो. पुदिन्याची काही पाने बारीक करून एक ग्लास गरम पाण्यात मिसळा. तुमच्या मुलाला हे मिश्रण द्या.
दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे इंफेक्शनशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवतात. मुलाला दर तासाला थोडे दही खायला द्या.
अर्धा चमचा एरंडेल तेल घ्या आणि ते हलके गरम करा. मुलाच्या पोटावर आणि नाभीला कोमट तेल लावा. तेल लावल्यानंतर विड्याच्या पानाने पोट झाकून घ्यावे. एरंडेल तेल पचनसंस्थेला चालना देऊन पोटदुखीपासून आराम देते. बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो.
मुलांमध्ये पोटदुखी दूर करण्यासाठी टिप्स - खाल्ल्यानंतर लगेचच मुलाला पाणी देऊ नका. जेवणानंतर अर्ध्या तासानंतरच पाणी प्यायला द्या. जर मुलाला पोटदुखी असेल तर त्याला सूप आणि ताज्या शिजवलेल्या भाज्या खायला द्या.