Room Cleaning Tips for Children : मुलांची खोली स्वच्छ ठेवण्यासाठी 'या; सोप्या पद्धतींचा घ्या मदत, खोली राहिल नेहमी स्वच्छ
लहान मुलांची रूम साफ करणे खरे तर पालकांकरता फार अवघड काम असते. लहान मुलं रूम साफ केली की लगेच ते रूम खराब करतात. जर तुम्ही रोज मुलांची रूम साफ करू शकत नसाल तर काही सोप्या टिप्स फाॅलो करणे गरजेचे आहे.ज्यामुळे तुमच्या मुलांची रूम साफ दिसू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरतील मुलांची रूम साफ करताना त्यांना देखील या कामात तुम्ही मदतीला घेऊ शकता. त्यांना रूमचे वेगवेगळे फोटो दाखवा जेणेकरून त्यांना रूम साफ केल्यावर ती कशी दिसेल हे कळू शकते.यामुळे रूम खराब झाल्यानंतर त्यांना ती कशी साफ ठेवायची हे कळू शकते.
काही वेळेस रूम साफ करताना मुले कंटाळा करतात. त्यांना कंटाळा यायला लागतो आणि ते कामाची टाळाटाळ करतात. अशा वेळी स्टाॅप वाॅचची मदत तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही गाणे ऐकत देखील रूम साफ करू शकता.
तुम्ही साफ-सफाईकरता रेटींग्सची मदत घेऊ शकता. त्याकरता तुम्ही मुलांना केलेल्या कामाकरता रेटींग्स देऊ शकता. जर मुलाने चांगले काम केले असेल तर त्यांना चांगले रेटींग्स देऊन तुम्ही बक्षिस देऊ शकता.असे केल्याने त्यांना रूम साफ करण्यात उत्साह येऊ शकतो.
लहान मुलांना त्यांच्या रूममधील फर्निचर आणि इतर वस्तू साफ करणे शिकवावे. जेणेकरून ते वेळोवेळी ते पुसून घेऊ शकतील.
अनेकदा घरतील लहान मुलं जेवण केल्यानंतर ताट त्याच ठिकाणी सोडून देते किंवा मग खेळल्यानंतर खेळणी तशीच ठेऊन जातात.अशा वेळी त्यांना योग्य ती शिस्त लावणे गरजेचे आहे.
मुलांना रूम साफ न केल्यानंतर काय होऊ शकते? त्यांना कोणत्या प्रकारचे इंन्फेक्शन होऊ शकतात? हे सगळे समजावून सांगावे.
सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांना काही शिकवण्याआधी तुम्ही स्वत: त्या गोष्टी करा म्हणजे तुमचे पाहून ते साफ-सफाई करायला शिकतील.
मुलांकरता तुम्ही टास्क ठरवून देऊ शकता आज कशाची सफाई करणार किंवा आपण सर्वजण मिळून हे काम करू.
तसेच मुलांच्या रूममध्ये टाॅय बास्केट ठेवा म्हणजे ज्यावेळी मुलं खेळण्यांना इकडे-तिकडे फेकेल त्यावेळी तुम्ही त्यांना टाॅय बास्केटचे महत्व समजावून सांगा आणि त्यांना त्यांच्या सर्व खेळण्या त्यात टाकायला सांगा.