Central Railway : चिंचवड ते आकुर्डी स्थानकादरम्यान रुळावर रचले होते मोठे दगड, पाहा फोटो
मध्ये रेल्वेचा पुन्हा एकदा मोठा अपघात होता होता टळला असल्याचं निर्दशनास आलं.

Central Railway
1/8
चिंचवड ते आकुर्डी स्थानकावर रुळावर मोठे दगड रचून ठेवल्याची बाब समोर आलीये.
2/8
पण हे दगड अद्याप कोणी रुळावर ठेवले याचा तपास लागलेला नाही.
3/8
त्यामुळे मोठ्या घातपाताची शक्यता यामुळे वर्तवण्यात येत आहे.
4/8
काहीच दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेस ज्या रुळावरुन जाणार होती, त्या रुळावर देखील दगड-धोंडे ठेवले होते.
5/8
चिंचवड ते आकुर्डी स्थानकादरम्यान मध्य रेल्वेचा मेंटेनन्स स्टाफ पेट्रोलिंग करिता गेला होता.
6/8
त्यावेळी या रुळावर एकावर एक दगड रचून ठेवल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
7/8
ही बाब लक्षात येताच तातडीने त्यांनी ते दगड बाजूला केले.
8/8
त्यामुळे एक मोठा घातपात होताहोता टळला.
Published at : 06 Oct 2023 10:48 PM (IST)