Health Tips : ताप, खोकला, सर्दीमध्ये 'या' पद्धतीने तुपाचं सेवन करा; अनेक आजार होतील दूर
भारतीय स्वयंपाकघरात तूप साधारण प्रत्येक घरात वापरले जाते. यामुळे जेवणाची चव वाढते. तसेच, तूप आरोग्यासाठीही चांगले आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदलत्या ऋतूमध्ये तुम्हाला आजारांपासून आराम हवा असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. तुम्हाला जर वारंवार सर्दी, खोकला आणि ताप जाणवत असेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता.
सामान्य फ्लूपासून सर्दीपर्यंत सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण तूप वापरतो.
तुपामध्ये इतर तेलांप्रमाणे फॅट नसते. हे एक सुपरफूड आहे जे आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांपासून आराम देते.
तूप जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के, तसेच निरोगी फॅटी ऍसिडसह आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. हे पोषक घटक रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात आणि तुमच्या शरीराला संक्रमणाशी लढण्यास मदत करतात.
तुपामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमच्या शरीरातील सूज कमी होते. तसेच तुपामुळे सूज, घसा आणि फुफ्फुसातील संक्रमण बरं करण्यास मदत होते.
तुपाने बॅक्टेरियावर मार करता येते. तुपामुळे तुम्ही तंदुरूस्त राहता. तुम्हाला ताप, खोकला किंवा सर्दी झाल्यास तूप थोडं गरम करून वापरू शकता.
तूप आणि काळी मिरी यांचे हे मिश्रण रक्तसंचय दूर करण्यात आणि घसा खवखवणे कमी करण्यास मदत करू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.