शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना भक्त भरभरून दान करत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेलंगाणा येथील सी भाग्यलक्ष्मी या भाविक महिलेने आज (दि.26) 258 ग्रॅम वजनाचा सुंदर नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकूट साईबाबांना अर्पण केला आहे.
या मुकूटाची किंमत जवळपास 18 लाख रुपये इतकी आहे.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
त्यानंतर संस्थानच्या वतीने देणगीदार साईभक्तांचा सत्कार करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी सुद्धा एका भाविकाने बारा लाखांचा मुकुट साईबाबांना दान केला होता.
त्यानंतर तेलंगणाच्या महिला भक्ताकडून आज 18 लाखांचा सुवर्ण मुकूट अर्पण करण्यात आला.
साईबाबांना सुवर्ण मुकूट अर्पण करण्याची कित्येक दिवसांची इच्छा महिलेने पूर्ण केली.
image दरम्यान, साईबाबांना सुवर्ण मुकूट अर्पण करण्याची इच्छा पूर्ण झाल्यावर महिला भावुक झालेली पाहायला मिळाली.
साईबाबांना मुकूट अर्पण केल्यानंतर महिलेला अश्रू अनावर झाले होते.