नदीपात्रातील पाण्यात वाढ झाल्याने बाहेर पडलेल्या मगरीला वाहनाची धडक, गोरेगावातील नदीपूलावर मृत्यू

Crocodile in Goregon : मुसळधार पावसाने नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे, त्यामुळे पात्रातून बाहेर पडलेल्या मगरीला एका वाहनाने धडक दिलीये. त्यातच तिचा मृत्यू झालाय.

Photo Credit - abp majha reporter

1/10
Crocodile in Goregon : गेली दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोरेगाव येथील काळ नदीपात्राच्या पाण्यात वाढ झाली आहे.
2/10
त्यामुळे पात्रातील मगरी बाहेर पडत असल्याची बाब समोर आली आहे.
3/10
अशाच प्रकारे नदीपात्रा बाहेर आलेल्या एका चार फूट लांबीच्या मगरीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
4/10
गोरेगावातील नदीपूलावर मगरीचा मृत्यू झाला आहे.
5/10
वाहनाची धडक लागल्याने मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
6/10
स्थानिक लोकांना रस्त्यावर मगर आढळली, त्यानंतर मगरीजवळ बघ्यांची गर्दी जमली होती.
7/10
माणगाव तालुक्यातील काळ नदीच्या पुलावरील रस्त्यावर मगरीला वाहनाची ठोकर लागली.
8/10
वाहनाची ठोकर लागल्याने मगरीचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
9/10
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडतोय.
10/10
दरम्यान, पावसाचा फटका वन्यप्राण्यांना देखील बसताना दिसत आहे.
Sponsored Links by Taboola