Makar Sankranti : 'प्रभू श्रीरामांनी' उडवला होता पतंग? जाणून घ्या, मकर संक्रातीला पतंग का उडवतात?
मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र, सर्वत्र ते साजरे करण्याच्या पद्धती आणि परंपरांमध्ये फरक आहे. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवण्याची, खाण्याची आणि दान करण्याची परंपरा आहे. या दिवशी काळे तीळ आणि गुळाचे दान करणे देखील खूप महत्वाचे मानले जाते. [Photo Credit : Pexel.com]
याशिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी देशात काही ठिकाणी पतंगही उडवले जातात आणि असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. [Photo Credit : Pexel.com]
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग का उडवतो? मकर संक्रांतीच्या दिवशी आकाशात रंगीबेरंगी पतंग पाहायला मिळतात आणि अनेक ठिकाणी पतंग उडवण्याच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. त्यामुळे मकर संक्रांतीशिवाय याला पतंगोत्सव असेही म्हणतात. [Photo Credit : Pexel.com]
पतंग उडविणे यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही मान्यता आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग का उडवले जातात हे जाणून घेणार आहोत. [Photo Credit : Pexel.com]
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली असून त्यामागे एक पौराणिक कथा आहे. धार्मिक कथेनुसार, भगवान श्रीरामांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पहिल्यांदा पतंग उडवला होता. [Photo Credit : google .com]
पतंग उडत असतानाच त्यांचा पतंग इंद्रलोकात पोहोचला. हे पाहून सर्व देवी-देवतांना आनंद झाला. तेव्हापासून मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा सुरू असल्याचे सांगितले जाते. [Photo Credit : Pexel.com]
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यामागेही शास्त्रीय महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि या दिवशी पतंग उडवल्यास व्यक्तीला सूर्याकडून शक्ती प्राप्त होते. [Photo Credit : Pexel.com]
हिवाळ्यात आपल्याला सूर्यप्रकाश आणि उष्णता मिळते, जी आरोग्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. याशिवाय पतंग उडवताना संपूर्ण शरीराची हालचाल होते . असे करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]