Health tips : पायाला सतत खाज येते आणि तळव्यांची जळजळ होतेय? 'या' घरगुती उपायांनी मिळेल पायांना आराम!
तळव्यांना जळजळ आणि खाज येत असेल तर लिंबू आणि बेकिंग सोड्याची पेस्ट पायांवर लावावी त्यामुळे लवकर आराम मिळतो. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतळव्यांना खाज येत असेल तर दह्याने तळव्यांना मसाज करा. दही शीत गुणधर्मांनी समृद्ध असते, त्यामुळे पायांना थंडावा मिळतो. (Photo Credit : unsplash)
तळव्यांची जळजळ कमी करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे बर्फ. बर्फाच्या पाण्यात १०-१५ मिनिटे पाय ठेवल्याने तळपायाची आग कमी होते. (Photo Credit : unsplash)
शरीरात विषारी द्रव्यांचे प्रमाण जास्त असल्याने तळवे दुखतात आणि जळजळ होते.अशा स्थितीत भरपूर पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक लघवीसोबत बाहेर पडतात. (Photo Credit : unsplash)
तळव्यांना जळजळ आणि खाज येत असेल तर बादलीत पाणी भरून त्यात मिठाचे खडे मिसळा, त्यानंतर बादलीत थोडा वेळ पाय टाकून बसा. पाणी कोमट असेल तर लवकर आराम मिळतो. (Photo Credit : unsplash)
जास्त प्रमाणात पायांना खाज येत असेल तर कोरफडीचा गर पायांना लावावा, त्यामुळे पायात थंडावा जाणवेल. (Photo Credit : unsplash)
खोबरेल तेल आणि देशी कापूर एकत्र करावे आणि हे मिश्रण पायांच्या तळव्यावर लावा,त्यामुळे पायाला थंडावा जाणवेल. पायांची जळजळ आणि खाज शांत होईल. (Photo Credit : unsplash)
अॅपल सायडर व्हिनेगर पायांची जळजळ दूर करण्यासाठी मदत करते. अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात, त्यामुळे संसर्ग दूर होतात. (Photo Credit : unsplash)
जेवणात वापरली जाणारी हळद पायांसाठी फायदेशीर आहे. पायात जळजळ आणि खाज येत असेल तर हळद आणि खोबरेल तेल एकत्र लावल्याने आराम मिळतो. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे संसर्ग कमी करतात. (Photo Credit : unsplash)
निलगिरीच्या तेलात दाहविरोधी गुणधर्म असतात जे पायाची सूज कमी करतात. निलगिरीच्या तेलानं पायांना मसाज केल्यास पायांना थंडावा मिळतो. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)