Somvati Amavasya : सोन्याची जेजुरी.. सोमवती अमावस्येनिमित्त खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने जेजुरीत
जयदीप भगत, बारामती
Updated at:
17 Jul 2023 10:41 AM (IST)
1
जेजुरीच्या खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा ही सोमवती अमावस्याला भरते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज सोमवती अमावस्या असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.
3
आज दुपारी 1 वाजता पालखीतून देव हे कऱ्हा स्नानासाठी नेले जातील.
4
दुपारी साडे तीन वाजता देवाला कऱ्हा स्नान घातले जाईल.
5
सोमवती आमवास्येला खंडेरायाची मोठी यात्रा असते.
6
यात्रेला 2 ते 3 लाख भाविक हे जेजुरीमध्ये खंडेरायाच्या दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली आहे.
7
तसेच या यात्रेसाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
8
सदानंदाचा जयघोष आणि भंडारा खोबऱ्याची मुक्त उधळण त्याने संपूर्ण गड परिसर जेजुरीतील रस्ते पिवळे धमक भंडाऱ्याने रंगले आहेत.
9
त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रुप आलं आहे.