Kitchen Tips: अंडी फ्रिजमध्ये ठेवणं पडेल महागात; 'ही' आहे अंडी साठवण्याची योग्य पद्धत
फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी बाहेर काढून उकडल्यावर ती फुटतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबऱ्याचदा अति थंड तापमानामुळे फ्रिजमध्ये ठेवलेल्या अंड्यांतील पोषक तत्वं नष्ट होतात.
अनेकदा अंड्याच्या वरच्या कवचाला घाण लागलेली असते आणि काही लोक अंडी न धुताच फ्रिजमध्ये ठेवतात, अशा वेळी फ्रिजमधील इतर गोष्टींनाही संसर्ग होण्याचा धोका असतो.
अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर सामान्य तापमानात ठेवल्यास कंडेन्सेशनची शक्यता वाढते. कंडेन्सेशनमुळे अंड्याच्या कवचावर असलेल्या बॅक्टेरियाचा वेग वाढू शकतो आणि हे जीवजंतू अंड्याच्या आत प्रवेश करण्याची शक्यता देखील वाढते.
तुम्हाला फ्रिजमध्ये अंडी ठेवायचीच असतील तर फ्रिजचं तापमान सामान्य ठेवावं, यामुळे अंडी ताजेपणा टिकवून ठेवतात आणि खराब होण्याचा धोका कमी होतो.
अंडी ओलावामुक्त वातावरणात ठेवा, कारण जास्त ओलाव्यामुळे अंडी खराब होऊ शकतात.
तुम्ही ज्या पॅकेजिंगमध्ये अंडी विकत घेतली त्याच पॅकेजिंगमध्ये ती फ्रिजमध्ये ठेवा.
पॅकेजिंग उघडलं असेल तर अंडी हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा.