Goat Milk : गाईच्या दुधापेक्षा जास्त फायदेशीर असतं बकरीचं दूध, जाणून घ्या बकरीच्या दूधाचे फायदे
आरोग्यासाठी अनेक जण गाईचं दूध पितात. पण तुम्हाला माहित आहे की गाई आणि म्हशीच्या दूधापेक्षा बकरीचं दूध आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरु शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.
बकरीच्या दुधात मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, जे हृदयासाठी फायदेशीर ठरु शकते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्ट्रोलचे प्रमाण योग्य राखण्यास देखील बकरीचे दूध फायदेशीर ठरु शकते.
बकरीच्या दुधात अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे तुमच्या शरीरासाठी अनेक फायदे मिळण्यास मदत होते.
बकरीचे दूध पचण्यास हलके असते. कारण गाईच्या दूधात असणाऱ्या प्रथिन्यांपेक्षा बकरीच्या दूधामध्ये असलेले प्रथिने लवकर पचतात.
त्यामुळे बकरीचे दूध पोटाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरु शकते.
बकरीचे दूध हाडांसाठी उपयुक्त ठरु शकते. यामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते.
लॅक्टोज चे प्रमाण बकरीच्या दुधात कमी प्रमाणात असते. तर गायीच्या दूधामध्ये याचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे एलर्जी होण्याची शक्यता असते.
बकरीच्या दूधामध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होण्यास मदत होते.