Shrawan : आज उत्तर भारतातील श्रावणातील शेवटचा सोमवार, महादेवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी
श्रावण महिन्यात सोमवारच्या दिवशी महादेवाचं दर्शन घेणं हे पवित्र मानलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर भारतात श्रावण महिन्याचा आजचा शेवटचा सोमवार आहे. त्यामुळे देशभरातील महादेवाच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली.
श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनाला अनोखे महत्व असते. देश विदेशात महादेवाचे अनेक रूपांची शेकडो पुरातन मंदिरे असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जातात.
श्रावण सोमवार निमित्त देशभरातील महत्त्वाच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.
उत्तर भारतात शेवटचा श्रावण सोमवार असल्याने महादेवाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून भाविक आल्याचं दिसून आलं.
मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येणार असल्याने होणारी गर्दी लक्षात घेता गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.
मंदिर परिसरात पोलिसांनी सुरक्षेच्या चोख व्यवस्था ठेवल्या असून सर्व उपाययोजना करण्यात आल्याचं दिसून आलं.
त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांचा देखील बंदोबस्त मंदिर परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे.
श्रावणी सोमवारनिमित्त अनेक मंदिरांत आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. गुलाब, कामिनी, झेंडू इत्यादी फुलांनी केलेल्या सजावटीमुळं विठ्ठलाच्या मंदिराला मोहक रुप लाभलंय.