Avoid Negativity: जीवनातील 'या' 7 नकारात्मक विचारांपासून दूर राहा; आयुष्यात नेहमी मिळेल आनंद
नकारात्मक विचारांना दूर ठेवून आपण स्वत:वर प्रेम करणं शिकलं पाहिजे आणि स्वत:ची काळजी घेतली पाहिजे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयुष्यात आनंदी राहण्यासाठी काही नकारात्मक विचार थांबवले पाहिजे, त्याबद्दल जाणून घेऊया.
परिपूर्ण राहण्याचा विचार (Perfectionism): जर तुम्ही तुम्हाला शक्य नसाणारी गोष्ट साध्य करण्याचा सतत विचार करत असाल आणि त्यात यश मिळत नसेल तर तुम्हाला 'तुम्ही कुठेतरी नेहमी कमी पडत आहात', ही भावना सतत जाणवेल. हे तुमच्या मानसिक आरोग्यास हानीकारक असेल.
स्वत:ला आणि इतरांना जज करणं (Judgemental Behaviour): जेव्हा तुम्ही खूप जजमेंटल वागतात, म्हणजे समोरचा कसा आहे किंवा तुम्ही स्वत: कसे आहात, याचा विचार करता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या आणि इतरांमधील नकारात्मक गुणांवर जास्त लक्ष केंद्रित करता. हे करणं थांबवलं पाहिजे.
स्वत:वर शंका घेणं (Self-doubt): जेव्हा तुम्ही स्वत:वरच शंका घ्यायला लागता, तेव्हा तुमची डोकेदुखी वाढते आणि जगणं असहय्य होतं, त्यामुळे स्वत:ला कमी लेखणारे विचार त्वरित बंद केले पाहिजे.
सर्वात वाईट होईल असं गृहीत धरणं (Assuming the worst will happen): जर तुम्हाला कधीच चांगल्या गोष्टी होतील असं वाटत नसेल आणि आयुष्यात सगळं वाईटच होईल, असं वाटत असेल तर हा विचार त्वरित थांबवावा. कारण यामुळे चांगल्या गोष्टींची आशा दूर होते आणि अधिक नकारात्मकता आकर्षित होते.
काळजी (Worry): चिंता केल्यानं तुमचं आरोग्य आणि मानसिक स्थिती खालावते, त्यामुळे तसे विचार करणं टाळावं.
तक्रार करणं (Complaining): जेव्हा तुम्ही नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्ही कधीही समाधानी होऊ शकत नाही आणि आनंदी राहू शकत नाही. त्यामुळे सतत तक्रार करणं टाळावं.
गोष्टी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणं (Trying to control everything): तुम्ही सर्वकाही नियंत्रित करू शकत नाही आणि जर तुम्ही कसा प्रयत्न करल असाल आणि तु्म्हाला यश मिळत नसेल, तर तुम्ही फक्त स्वत: ला दोष द्याल आणि तुमचं मानसिक खच्चीकरण होईल.
त्यामुळे जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर सर्व नकारात्मक विचार आणि एखाद्या गोष्टीची उगाच काळजी करणं थांबवलं पाहिजे.