Jejuricha Khandoba : बहुजन समाजाचा लोकदेव, जेजुरीच्या खंडोबाच्या चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाच्या चंपाषष्ठी उत्सवाला जेजुरी गडावर प्रारंभ झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरवीर पिठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते जेजुरी गडावर श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींची घट स्थापना करण्यात आली.
कुलदैवत खंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ यात्रा भरतात.
खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला धार्मिक महत्व आहे.
पौराणिक काळात मनी आणि मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने खंडोबाचा अवतार घेवून दैत्याशी युद्ध केले.
पाच दिवस युद्ध करून दैत्यांचा पराभव करून विजय मिळविला.
या विजयाचे प्रतीक म्हणून पौराणिक काळापासून जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो.
आज खंडोबा मंदिरात देवाची पूजा अभिषेक झाल्या नंतर उत्सव मूर्तींची वाजत गाजत मिरवणूक काढून मूर्ती रंग महालात आणण्यात आल्या.
करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती ,देवसंस्थानचे विश्वस्त,पुजारी सेवक वर्ग व ग्रामस्थांच्या वतीने पूजा करून घट स्थापना करण्यात आली.
या उत्सवा निमित्त गडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.