Janmashtami 2023 : श्रीकृष्णाला तुळशी अत्यंत प्रिय! जन्माष्टमीला करा तुळशीचे 'हे' उपाय, मिळवा आशीर्वाद
श्रीकृष्णाला तुळशी अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण केली जाते. जन्माष्टमीला श्रीकृष्णाला तुळशी अर्पण करण्यासोबतच हे उपायही अवश्य करा. यामुळे तुम्हाला संकटापासून आराम मिळतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे दरवर्षी या तिथीला कृष्ण जन्माष्टमी किंवा कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी ही तारीख 6 सप्टेंबर 2023 रोजी येत आहे.
भगवान विष्णूंना तुळशीवर खूप प्रेम आहे. भगवान विष्णूचा अवतार असल्याने भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करण्याची परंपरा आहे.
जन्माष्टमीच्या दिवशी भोगामध्ये लोणी, साखर, धणे, पंजिरी किंवा तुळस घालून भगवान श्रीकृष्णाला अर्पण करा. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते.
जन्माष्टमीच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून तुळशीला प्रदक्षिणा घालावी. या उपायाचे पालन केल्याने जीवनात सुख-समृद्धी वाढते.
काही कारणास्तव लग्नाला उशीर होत असेल किंवा लग्न पुन्हा पुन्हा तुटत असेल तर अशा मुलींनी जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरी तुळशीचे रोप लावून त्याची नित्य पूजा करावी. त्यामुळे लवकर विवाह होण्याची शक्यता निर्माण होते.
जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीसमोर बसून भगवान श्रीकृष्णाच्या चार नावांचा जप करा - गोपाल, देवकीनंदन, गोविंदा आणि दामोदर. या नावांना भगवान श्रीकृष्णाचे मूळ मंत्र म्हटले गेले आहे. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला तुळशी अर्पण करण्यासोबतच तुळशीशी संबंधित काही फायदेशीर उपाय करू शकता. या उपायांनी सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्ती मिळते.