Hit and Run Case : 'हिट अँड रन'ची ती काळी रात्र! अपघातावेळी नेमकं काय घडलं? सलमान खाननं सांगितलं...
सलमान खानशी संबंधित हिट अँड रन प्रकरण आता बंद झालं आहे. 2015 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी सलमान खानची निर्दोष मुक्तता केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमान खानच्याविरोधात सादर करण्यात आलेले पुरावे पुरेसे नसल्याने हे प्रकरण बंद करण्यात आलं. कारण, त्या पुराव्याच्या आधारे सलमानला शिक्षा होऊ शकत नाही.
सलमान खानचं हे प्रकरण आता बंद झालेलं असलं, तरी हा वाद अनेक वर्षांपासून सुरु होता.
सलमान खानने अनेक वर्षांपूर्वी 'आप की अदालत' कार्यक्रमात याबाबत खुलेपणाने वक्तव्य केलं होतं आणि त्या रात्री नेमकं काय घडलं, ते सांगितलं होतं.
सलमान खानने सांगितलं होतं की, 'मला आजपर्यंत त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. मी घरी जातान ते उजवे वळण लागतं आणि त्या वळणावरून मी पुढे वळलो की माझ्या गाडीसोबत काय घडलं ते मला आठवतं. मी तेव्हा त्या गाडीत होतो.
'मी त्या रस्त्यावरून गेल्यावर मला काय वाटतं याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. ही सर्वात वाईट भावना आहे आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता, मी आणि कमल मागे बसलो होतो आणि आमच्याकडे एक पोलीस सुरक्षा रक्षक होता.'
'ड्रायव्हरने ब्रेक दाबताच आमची गाडी रस्त्यावर पसरलेल्या खडीवरु घसरली. लोक सांगतात की, त्यावेळी कार 180-200 च्या वेगाने होती. पण, त्या ठिकाणी गाडी तेवढ्या वेगाने जाऊ शकत नाही हे तुम्हाला दिसेल.'
'तुम्ही शुमाकरलाही (Michael Schumacher) गाडी दिली, तर तोही तिकडे इतक्या वेगाने गाडी चालवू शकणार नाही. पण ही बातमी खूप मोठी झाली कारण, सलमान खानचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. आम्ही अजूनही खटला लढत आहोत.' असं सलमानने त्यावेळी सांगितलं होतं.
पुढे सलमान म्हणाला की, 'ही बातमी खूप मोठी झाली की सलमान खानचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. आम्ही अजूनही केस लढत आहोत. आम्ही कोर्टात लढू आणि जिंकू किंवा जो निर्णय येईल...' सलमानची ही मुलाखत खूप जुनी आहे, त्यावेळी ही केस कोर्टात सुरु होती.
आता ही केस बंद झाली आहे आणि सलमान खानची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.