Devi Lakshmi : जीवनात सुख-समृद्धी वाढवण्यासाठी आज करा 'हे' विशेष उपाय, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न!
शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत उपयुक्त मानला जातो. शुक्रवारी केलेल्या या उपायांनी देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशुक्रवारी केलेल्या या उपायांमुळे आर्थिक लाभ होऊन जीवनात सुख-समृद्धी येते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी कोणते काम करावे? ते जाणून घ्या
या दिवशी घराची फरशी पुसताना त्यात चिमूटभर हळद घालावी. या दिवशी गायीला पोळी खायला द्यावे. या दिवशी गायीची सेवा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
शुक्रवारी दूध आणि तांदळाची खीर तयार करून देवी लक्ष्मीला अर्पण करावी. यानंतर ते स्वतः सेवन करा. या दिवशी शुक्राच्या बीज मंत्राचा जप केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
क्रिस्टल थेट शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. एखाद्याच्या कुंडलीत शुक्र ग्रहाचा दोष असेल तर त्याने शुक्रवारी चांदीच्या अंगठीत क्रिस्टल रत्न धारण करावे.
घरात अनेकदा आर्थिक संकट असेल तर शुक्रवारी वेलचीचा उपाय करून पाहा. यासाठी शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीला 5 लहान वेलची अर्पण करा. पूजेनंतर या वेलची तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. असे केल्याने संपत्ती वाढते.
शुक्रवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करावे. आता त्याच ठिकाणी बसून भगवान शिवाच्या पाच अक्षरी मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा जप करा.
या मंत्राचा जप केल्यानंतर देवी लक्ष्मीचा 'ओम श्रीं ह्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मीयै नमः' या मंत्राचा जप करावा. शुक्रवारी हा उपाय केल्यास मनोकामना पूर्ण होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)