Dasara 2023: दसरा 23 की 24 ऑक्टोबरला? रावण दहन, शस्त्रपूजनाची शुभ वेळ जाणून घ्या
धार्मिक मान्यतेनुसार, विजयादशमीला दसरा साजरा केला जातो. या दिवशी श्रीरामांनी रावणाचा वध केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच शारदीय नवरात्रीत महिषासुराशी 9 दिवस युद्ध केल्यानंतर माता दुर्गाने दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याला त्याचा वध केला, त्याच दिवशी श्रीरामाने लंकापती रावणाचा नाश करून विजय मिळवला. म्हणूनच याला विजयादशमी म्हणतात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जाणार आहे. पंचांगानुसार, यावर्षी दशमी तिथी 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.44 वाजता सुरू होईल आणि 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.14 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 24 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे.
दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्तावर किंवा दुपारी श्री रामाची पूजा केली जाते. 24 ऑक्टोबर 2023 रोजी विजय मुहूर्त दुपारी 01.58 ते 02.43 पर्यंत आहे. त्याच दिवशी दुपारी पूजेची वेळ दुपारी 01.13 ते 03.28 पर्यंत आहे. या दोन शुभकाळातच शस्त्रपूजा केली जाते.
दसऱ्याच्या दिवशी प्रदोष काळात रावण दहन केले जाते. 24 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 05:43 ते अडीच तास रावण दहन होईल.
दसऱ्याच्या दिवशी देशातील काही भागात शेणाचे 10 गोळे करून त्यावर जवाच्या बिया टाकतात. अगरबत्ती आणि दिवे लावून प्रभू श्री रामाची पूजा करून हे गोळे जाळून टाकण्याची प्रथा आहे.
हे 10 गोळे अहंकारी, लोभी आणि रावणाच्या रागाचे प्रतीक आहेत. त्यांचे दहन केल्याने या दुष्कृत्यांचा नाश होतो. अशी मान्यता आहे
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)