Shirdi Saibaba : साईचरित्र पारायण सोहळ्याची 29 वर्षांची परंपरा कायम, आज भव्य मिरवणुकीने सांगता, पाहा फोटो
साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत साई पारायण सोहळ्याची भव्य मिरवणुकीने सांगता झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान या पारायण सोहळ्यात के सी सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र जळगाव निर्मित 'भावयात्रा ' या कार्यक्रमाचा 7 वा प्रयोग सादर करण्यात आला होता.
सात दिवस सुरू असलेल्या पारायण सोहळ्यात साडेपाच हजार पारायणार्थी भाविक सहभागी झाले होते. मिरवणुकीत विविध चित्ररथ पाहायला मिळाले.
श्रावण महिना सुरु झाला की, सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांची सुरवात होते. शिर्डीतही तीन मुख्य उत्सवानंतर साईचरित्र पारायण सोहळा महत्वाचा उत्सव असतो.
सलग नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यंदा या सोहळ्याचे 29 वे वर्ष होते.
भाविकांनी वेशभुषा परिधान करत भाविकांनी मिरवणुकीची शोभा वाढवली. महिलांनी पारंपारिक वाद्याच्या तालावर नाचण्याचा मनमुराद आनंद घेतला.
श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुरूवार आला. त्याच दिवशी साईसच्चरित्र पारायणास सुरूवात झाली..
आज काल्याच्या किर्तनाने पारायणाची सांगता झाली आहे. यावेळी पारायण सांगता सोहळ्यास हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली.
नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यादरम्यान महिलांच्या हळदीकुंकु कार्यक्रमासोबत अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत साई पारायण सोहळ्याची भव्य मिरवणुकीने सांगता झाली.