Raksha Bandhan 2023 : 900 प्रकारच्या 18 लाख राख्या विक्रीसाठी तयार, वसमतच्या राखीला परराज्यात मागणी
रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरक्षाबंधन सण म्हटला की वेगवेगळ्या रंगीबेरंगी त्याचबरोबर आकर्षक राख्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते.
हीच मागणी लक्षात घेता वसमत शहरातील रहिवासी असलेल्या पांडुरंग कोसलगे यांनी मागील आठ वर्षापासून राखी निर्मितीचा व्यवसाय सुरु केला.
मेरा भैया प्यारा भैया, देवी देवताच्या नक्षीदार, डोरेमॉन किड्स इलेक्ट्रिकल लाईटच्या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या राख्या पांडुरंग कोसलगे यांनी त्यांच्या कंपनीमध्ये तयार केल्या आहेत.
या राख्यांना महाराष्ट्रासह इतर राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी असते. तेलंगणा, आंध्र प्रदेशात सुद्धा या राखीची मागणी आहे.
कारण मनापासून तयार केलेली बेसिक नक्षीदार राखीची मोठ्या प्रमाणात होत असते आणि या बेसिक नक्षीदार राख्यांना सुद्धा तयार करण्यासाठी पांडुरंग कोसलगे यांनी प्राधान्य दिले आहे.
यावर्षीच्या रक्षाबंधनचा सण लक्षात घेता अकरा महिन्यांपूर्वी राखी निर्मितीला सुरुवात केली होती.
यावर्षीचा सीझनसाठी पांडुरंग कोसळली यांनी तब्बल 900 प्रकारच्या 18 लाख राख्यांची निर्मिती केल्याचा पांडुरंग कोसलगे सांगत आहेत.
महागाईने कळस घातला असला तरीही सर्वसामान्य लोकांना राखी हा सण साजरा करत असताना खिशाला आर्थिक भार पडू नये यासाठी कोसलगे यांनी तीन रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत किमतीच्या राख्या बनवल्या आहेत.
या राखी निर्मितीच्या उद्योगांमध्ये शंभर ते दीडशे महिलांच्या हाताला काम मिळत आहे.