Relationship Tips : 'ही' लक्षणे दर्शवतात की तुम्ही रिलेशनशिप डिप्रेशनमधून जात आहात , काय आहेत लक्षणे? या समस्येवर उपाय काय करावेत? पाहा
कोणत्याही नात्यात प्रेमासोबतच विश्वासही महत्त्वाचा असतो. नात्यातील कोणत्याही प्रकारची जबरदस्ती ते नाते कमकुवत बनवते. या प्रकारच्या नातेसंबंधात, लोकांना नेहमीच तणाव जाणवतो आणि कधीकधी यामुळे नैराश्य येते. जेव्हा एखाद्या नात्यातले प्रेम कमी होते, आदर कमी होतो त्यावेळी माणूस डिप्रेशनमध्ये जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनात्यात उदासीनता का येते - कोणतेही नाते प्रेम आणि विश्वासावर टिकलेले असते. नात्यातील प्रेम आणि विश्वास कमी झाला की, नात्यात दुरावा निर्माण होतो. यामुळे कधी कधी एका जोडीदाराला नैराश्याचा सामना करावा लागतो. नात्यात उदासीनता एकमेकांमुळेच येते, असे नाही. कधीकधी व्यस्त जीवनशैली, कुटुंबातील काही समस्या किंवा कम्युनिकेशन गॅप यामुळेही ही समस्या उद्भवू शकते.
रिलेशनशिप डिप्रेशनच्या लक्षणांबद्दल बोलताना, मेडिकल हेल्थ टुडेच्या मते, हा एक प्रकारचा मूड डिसऑर्डर आहे ज्यामध्ये व्यक्ती नेहमी नकारात्मक गोष्टींचा विचार करते. जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते तेव्हा त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये बरेच बदल दिसून येतात.
रिलेशनशिप डिप्रेशनमध्ये, एखादी व्यक्ती नेहमी दुःखी राहते. ती व्यक्ती नेहमी चिडलेला किंवा कोणत्या तरी काळजीत असते, आत्मविश्वास गमावतो, थकल्यासारखे वाटते, त्याला निर्णय घेणे कठीण होते, हळूहळू त्या व्यक्तीचा सगळ्या गोष्टीतील रस कमी होतो आणि त्याला आत्महत्येचे विचार येऊ लागतात.
नात्यात असतानाही एकमेकांवर प्रेम न करणे, एकमेकांची काळजी न घेणे, जोडीदारापासून अंतर ठेवणे, एकमेकांवर विश्वास न ठेवणे, नातेसंबंधात असतानाही एकटेपणा जाणवणे, सतत चिडचिड होणे हे याचे कारण असू शकते. कम्युनिकेशन गॅप हे याचे सर्वात मोठे कारण असू शकते.
जर अशी लक्षणे तुमच्या पार्टनरमध्ये दिसत असतील तर तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, तुमच्या जोडीदाराच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करा, त्याच्यासाठी थोडा वेळ काढा आणि जास्त अपेक्षा न करता चांगला वेळ घालवा. तिला किंवा त्याला बाहेर फिरायला घेऊन जावा.
लोकांचा असा गैरसमज आहे की डिप्रेशनमध्ये लोक फक्त दुःखी राहतात. मात्र सतत चिडचिड करणे हे देखील नैराश्याचे लक्षण आहे. म्हणून, तुम्ही तुमच्या जोडीदाराचे हे वागणे गांभीर्याने घ्या आणि तुम्ही त्याला/तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात असे त्याला/तिला वाटून देण्याचा प्रयत्न करा.
नैराश्यामध्ये, एखाद्या व्यक्तीला आपल्या जोडीदारासोबत गोष्टी शेअर करण्यात अडचणी येतात. समोरासमोर बोलावे असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही ईमेल, मेसेज किंवा पत्र लिहून तुमच्या पार्टनरसोबत तुमचे विचार शेअर करू शकता. जर तुमच्या जोडीदाराला असे काही करायचे असेल तर त्याचे म्हणणे गांभीर्याने घ्या आणि त्याच्याशी संयमाने बोलण्याचा प्रयत्न करा.
नात्यातील अशी परिस्थिती टाळण्यासाठी जोडीदाराशी बोलणे थांबवू नका. जोडीदाराशी बोलूनच ही समस्या सोडवली जाऊ शकते. यामुळे तणाव तसेच एकटेपणा दूर होऊ शकतो. जर तुम्हाला नैराश्य आणि तणावापासून दूर राहायचे असेल तर तुमच्या जोडीदाराला डेटवर घेऊन जा. यामुळे नात्यातील प्रेम आणि विश्वास दोन्हीही वाढू शकतो.
स्वतःसाठी वेळ देणंही गरजेचं आहे.तुम्ही जर नात्यात नैराश्याचा सामना करत असाल तर सगळ्यात आधी स्वतःला वेळ द्या. स्वतः थोडा वेळ काढून यामागचे कारण काय आहे याचा विचार करा आणि कारणे जाणून घेतल्यानंतर ती दूर करण्याची जबाबदारी तुमची आहे.