Foods For Normal Delivery : गरोदरपणात 'या' गोष्टी जरूर खाव्यात, आई आणि मूल दोघांकरता आहेत फायदेशीर
गरोदरपणात प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिची डिलीव्हरी ही नाॅर्मल व्हावी. परंतु अनेकदा काही समस्यांमुळे सिझेरियन डिलीव्हरी करावी लागते. तज्ज्ञांच्या मते, सिझेरियन डिलीव्हरीमुळे पोटाला टाके पडतात. त्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. याशिवाय, ऑपरेशननंतर अशक्तपणा देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. पण तुम्हाला माहित आहे का की काही पदार्थ आहेत ज्याचा समावेश तुम्ही रोजच्या आहारात केला तर तुमची नाॅर्मल डिलीव्हरी होऊ शकते. जाणून घेऊयात या पदार्थांविषयी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगरोदरपणात प्रत्येक गर्भवती महिलेला संतुलित आहाराची गरज असते. याशिवाय शरीरात भरपूर प्रथिने, जीवनसत्त्वे असणे आवश्यक आहे. कारण गरोदरपणात कोणत्याही महिलेच्या शरीरातील पोषणाची गरज वाढते. म्हणून, नैसर्गिकरित्या, स्वतःचे आणि आपल्या बाळाचे आरोग्य राखण्यासाठी चांगले खाणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे नाॅर्मल डिलीव्हरीची शक्यता खूप कमी होते.
तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणेदरम्यान अनेक महिलांना दुधाचा वासही आवडत नाही, त्यामुळे महिला दूध पिणे सोडून देतात. पण असे करणे चुकीचे आहे. कारण दूध हा प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. दिवसातून एक कप दूध पिल्यास 8.22 ग्रॅम प्रथिने मिळू शकतात. दूध हे आई आणि गर्भातील मूल दोघांच्याही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. प्रथिने गर्भाशयाला मजबूत करते, रक्तपुरवठा सुधारते आणि बाळाचे पोषण करण्याचे कार्य करते.
संत्र्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. नॉर्मल आणि हेल्दी डिलीव्हरी या दोन्हीसाठी त्याचे सेवन खूप महत्वाचे आहे. संत्र्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पहिली म्हणजे त्यात 90 टक्के पाणी असते, जे शरीरातील द्रवपदार्थाची गरज पूर्ण करण्यास मदत करते. यासोबतच संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात आढळते. अशा स्थितीत संत्र्याचे सेवन केल्याने बाळाची त्वचा मुलायम आणि सुंदर बनते. याशिवाय, हे गर्भधारणेदरम्यान संसर्गापासून संरक्षण करते.
अनेक गर्भवती महिला गरोदरपणात मांसाहार टाळतात. परंतु, जर तुम्हाला नाॅर्मल डिलीव्हरीद्वारे मुलाला जन्म द्यायचा असेल तर अंडी खाणे आवश्यक आहे. अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. याशिवाय त्यात अत्यावश्यक अमीनो अॅसिडही असतात. यासाठी गरोदर महिलांची इच्छा असल्यास त्या न्याहारी आणि दुपारच्या जेवणात अंड्यांचाही समावेश करू शकतात. स्नॅक्ससाठी हा एक चांगला पर्याय आहे. असे केल्याने तुमच्या पोटात वाढणारे बाळ निरोगी राहील आणि त्याचे केसही सुंदर होतील.
कार्बोहायड्रेट्सने समृद्ध ओट्स तुमच्या शरीरातील ऊर्जा पातळी वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे गरोदरपणात हे खूप फायदेशीर मानले जाते. गरोदरपणात अनेक समस्यांमुळे शरीर कमकुवत होते, त्यामुळे शेवटच्या क्षणी नाॅर्मल डिलीव्हरी होणे कठीण होते. त्यामुळे गरोदरपणाच्या सुरुवातीपासूनच आहारात ओट्सचा समावेश केल्यास नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते. तज्ज्ञांच्या मते, गरोदरपणात ओट्सचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते. पण हे ओट्स खाताना त्यात साखर घालू नका.
गरोदरपणात भोपळ्याच्या बियांचे सेवन करणे अधिक फायदेशीर मानले जाते. भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश केल्यास अधिक प्रथिने मिळतात. तज्ज्ञांच्या मते, या स्वादिष्ट बियांमध्ये पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असतात.
तज्ञांच्या मते गर्भवती महिलांनी संपूर्ण नऊ महिने रताळ्याचे सेवन केले पाहिजे. कारण रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. गरोदरपणात महिलांना व्हिटॅमिन ए चे सेवन 40 टक्क्यांनी वाढवावे लागते, त्यामुळे या काळात रताळ्यांचा आहारात समावेश करावा.
ज्या महिलांना नॉर्मल डिलिव्हरी हवी आहे त्यांनी ब्रोकोलीचे अवश्य सेवन करावी. ब्रोकोलीमध्ये फोलेट, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात आढळते. याशिवाय ब्रोकोली फायबरचा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. याशिवाय, अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध ब्रोकोली प्रसूतीपूर्वी उद्भवणाऱ्या आजारांशी लढण्यास मदत करते.
गरोदरपणात केळीचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. प्रसूतीदरम्यान थकवा आणि शरीरात दुखणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही केळीचे सेवन केले तर ते तुम्हाला अधिक ऊर्जा देऊन थकवा कमी करण्यास मदत करते. नाश्त्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.