Lalbaugcha Raja 2023 Visarjan LIVE : लालबाग नगरी दुमदुमली, भक्तांचा लाडका लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, गणेश भक्तांची अलोट गर्दी
लालबागच्या राजाची स्वारी मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलालबाग मार्केटमधून लालबागच्या राजाची स्वारी हळूहळू पुढे सरकत आहे.
लालबागच्या राजाची स्वारी मुख्य मंडपातून बाहेर आली असून मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे.
लालबाग मार्केटच्या गल्लीमध्ये राजाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांनी नोटांचे, पाना-फुलांचे हार लावल्याचं पाहायला मिळत आहे.
भक्तांचा लाडका लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला असून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
राजा मार्केटमधून बाहेर पडल्यानंतर लालबागला एकप्रदक्षिणा घालेल आणि त्यानंतर श्रॉफ बिल्डिंगच्या दिशेनं मार्गस्थ होईल.
श्रॉफ बिल्डिंगची मानाची पुष्पवृष्टी झाल्यानंतर राजा लालबागमधून भायखळ्याच्या दिशेनं मार्गस्थ होईल.
लालबागच्या राजाचा विजय असो... ही शान कुणाची... लालबागच्या राजाची.... अशा जयघोषात लालबागच्या राजाची स्वारी विसर्जनासाठी मार्गस्थ झाली आहे.
लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी लालबाग-परळमध्ये गणेश भक्तांनी गर्दी केली आहे.
10 दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा आज भक्तांचा निरोप घेणार आहे.