Spices In your Kitchen : 'हे' मसाले तुमच्या स्वयंपाकघरात नक्की असू दया...
मसाल्याशिवाय स्वयंपाकघर हे अपूर्ण असते. योग्य प्रमाणात आणि योग्य मसाल्यांनी बनवलेले पदार्थ जेवणाच्या ताटाला शोभा देते. अनेक प्रकारचे मसाले गृहिणी घरी बनवत असतात आणि त्याचा समावेश त्यांच्या स्वादिष्ट पदार्थामध्ये करत असतात. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाधे अन्न देखील खायला आवडू शकते पण मसाल्यांचा वापर करून केलेले पदार्थ जेवण परीपूर्ण करते. [Photo Credit : Pexel.com]
चव आणि सुगंध असलेले मसाले तुमचे जेवण पूर्ण करतात. फक्त एक चिमूटभर मसाला अन्नाला चव देऊ शकतो. अनेकजण मसालेदार जेवणाला पसंती देतात. [Photo Credit : Pexel.com]
त्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरात मसाले तर असावेत, यामुळे कोणते मसाले असावेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुमच्या जेवणाची चव वाढवणारे पुढील मसाले तुम्ही नेहमी ठेवावे. [Photo Credit : Pexel.com]
जिरे पावडर : हे भाजलेले आणि न भाजलेले दोन्ही प्रकारे मसाल्यात वापरतात. भाजलेले जिरे पावडर सामान्यतः वापरली जाते कारण त्याची चव मसालेदार असते. रायता किंवा चाट मध्ये वापरता येते. [Photo Credit : Pexel.com]
धने पावडर : धने पावडर प्रत्येक स्वयंपाकघरात असते. हे अन्न चवदार आणि सुगंधी बनवते. हे अन्नाला खारट चव जोडते म्हणून ते स्वयंपाकघरात असले पाहिजे. [Photo Credit : Pexel.com]
गरम मसाला : गरम मसाला तुमच्या स्वयंपाकघरात असलाच पाहिजे. गरम मसाल्यामध्ये एका बडीशेप, तमालपत्र, लवंग, जिरे, धणे यासारख्या मसाल्यांचे मिश्रण असते. कोणत्याही करी किंवा सुक्या भाजीची चव वाढवते. त्यात अनेक मसाले असल्याने त्याचा एक वेगळाच सुगंध येतो. [Photo Credit : Pexel.com]
लाल तिखट : जर तुम्हाला मसालेदार पदार्थ आवडत असतील तर तुमच्या स्वयंपाकघरात लाल तिखट ठेवा. [Photo Credit : Pexel.com]
हळद : हळदीचा वापर अन्नाला चवदार आणि सुंदर बनवण्यासाठी केला जातो. त्याचा वापर केल्याने अन्नाला वेगळा रंग येतो. [Photo Credit : Pexel.com]
याचबरोबर अनेक प्रकारचे मसाले उपलब्ध असतात त्यांचा देखील तुम्ही स्वादिष्ट भोजनासाठी वापर करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]