Names of Lord Ram: श्री राम आणि सीता माता यांची नावे.. तुमच्या बाळासाठी यातील नाव निवडा!
अयोध्या राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा दिवस म्हणजे आज 22 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारत देशात उत्साहात साजरा केला जात आहे. आज यामुळे तुम्ही यादीवशी तुमच्या जन्मलेल्या मुलांचे नाव प्रभू श्री राम आणि माता सीता यांची नावे तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी निवडू शकता. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभगवान राम आणि देवी सीता यांच्या काही दिव्य नावांबद्दल सांगत आहोत जे तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया श्री राम आणि देवी सीता यांच्या काही सुंदर आणि मनमोहक नावांबद्दल. [Photo Credit : Pexel.com]
रघुनाथ: श्री रामाला रघुनाथ असेही म्हणतात. हे नाव मुलांसाठी आहे आणि रघु हे नाव 90 च्या दशकात आणि त्यापूर्वी खूप लोकप्रिय होते. [Photo Credit : Pexel.com]
जनार्दन: भगवान विष्णूच्या अनेक नावांपैकी एक नाव जनार्दन आहे आणि या नावाचा अर्थ इतरांना मदत करणारा असा आहे. भगवान राम हे स्वतः भगवान विष्णूचे अवतार होते. [Photo Credit : Pexel.com]
राघव: अनेक लोक प्रभू रामाला राघव नावानेही हाक मारतात. ज्यांना अध्यात्मिक नावे आवडतात ते राघव नावाचा विचार करू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
अनिकृत: तुम्हाला तुमच्या मुलाचे वेगळे नाव हवे असेल आणि तुम्ही प्रभू रामाच्या नावांपैकी अनिकृत हे नाव नक्कीच आवडेल. या नावाचा अर्थ उच्च कुटुंबात जन्मलेला मुलगा. हे नाव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्वितीय आहे. [Photo Credit : Pexel.com]
सानवी: हे नाव मुलींसाठी आहे. देवी लक्ष्मीला सानवी म्हणतात आणि या नावाचा अर्थ आहे पूजनीय. देवी सीतेला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. [Photo Credit : Pexel.com]
वैदेही: माता सीता यांना वैदेही या नावानेही संबोधले जाते. तुम्ही तुमच्या बाळाचे नाव वैदेही ठेवू शकता. [Photo Credit : Pexel.com]
जानकी: सीतेचे दुसरे नाव जानकी आहे. राजा जनकाची कन्या असल्याने तिला जानकी असेही म्हणतात. [Photo Credit : Pexel.com]
पार्थवी: देवी सीतेचा जन्म पृथ्वीच्या उदरातून झाला, म्हणून तिला भूमी किंवा पृथ्वीची कन्या असेही म्हणतात. यावरून सीतेला पार्थवी म्हणजे पृथ्वीची कन्या असे नाव पडले. [Photo Credit : Pexel.com]
श्री राम किंवा माता सीता यांची ही लोकप्रिय नावे आहेत ज्यावर तुम्ही तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे नाव ठेवून आजचा दिवस स्मरणात ठेऊ शकता .टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]