Nagpur News: उपराजधानी'राम'मय!, केंद्रीय मंत्री नितीन गडकारींनी घेतले ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराचे दर्शन
अयोध्येतील (Ayodhya)प्रभूश्री राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळा अवघा भारत अनुभवत आहे.
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर (Ram Mandir) सत्यात अवतरलं आहे.
या निमित्याने संपूर्ण देशभरात मोठा उत्सव साजरा करण्यात येत आहे.
अशातच नागपूर शहरातील (Nagpur) ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरातही मोठा उत्सव साजरा करण्यात येत आहे.
आज केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी या मंदिरात जाऊन प्रभूश्री रामांचे दर्शन घेतले.
नागपुरातील ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरातर्फे आज 22 जानेवारीला मंदिर परिसर सुमारे दीड लाख दीपज्योतींनी उजळणार आहे.
या दीपज्योतीच्या माध्यमातून अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती, रामदरबार, धर्मरक्षक राम यांची आकृती आकारण्यात येणार आहे.
उपराजधानी नागपुरात देखील अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अवघे शहर 'राम'मय झाले आहे.
नागपुरातील संती गणेश उत्सव मंडळाच्या वतीने भव्य अशी श्री रामांची रांगोळी रेखाटली आहे. आज नितीन गडकरी यांनी या ठिकाणी भेट देऊन रांगोळी कलाकारचे कौतुक केले.