Onion juice benefits : कांद्याच्या रसाने असे खुलवा केसांचे सौंदर्य!
बदलती जीवनशैली, धूळ आणि प्रदूषणामुळे केसांच्या समस्या सामान्य आहेत, परंतु अनेकदा केसांच्या वाढीसंबंधित समस्या अधिकच वाढतात. अशा परिस्थितीत कांद्याचा रस तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस अतिशय उपयुक्त मानला जातो. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांद्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ए, आयर्न, झिंक, व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे केसांचे सौंदर्य वाढते. चला तर मग जाणून घेऊया, केसांसाठी कांद्याच्या रसाचे फायदे आणि ते बनवण्याची पद्धत. [Photo Credit : Pexel.com]
केसांची मुळे मजबूत करण्यासाठी : कांद्याच्या रसात सल्फर पुरेशा प्रमाणात आढळते. जे केस निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे मानले जाते. हे केस तुटण्यास प्रतिबंध करते, केस मजबूत बनवते. [Photo Credit : Pexel.com]
केसांचे पोषण करते :कांद्याच्या रसामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. जे केसांच्या मुळांना मजबूत करते. याचा वापर करून तुम्ही केस अकाली पांढरे होण्यापासून रोखू शकता. [Photo Credit : Pexel.com]
कोंडा कमी करा :कांद्याच्या रसामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात जे डोक्यातील कोंडा आणि इतर टाळू संक्रमण कमी करण्यास मदत करतात. जर तुम्हाला टाळूच्या खाज सुटण्याचा त्रास होत असेल तर कांद्याचा रस जरूर लावा, आराम मिळेल. [Photo Credit : Pexel.com]
कांद्याचा रस बनवण्याची पद्धत : यासाठी सर्वप्रथम कांदा सोलून त्याचे छोटे तुकडे करावेत. आता हे चिरलेले कांदे ब्लेंडरमध्ये किंवा फूड प्रोसेसरमध्ये बारीक पेस्ट होईपर्यंत मिसळा. [Photo Credit : Pexel.com]
नंतर ही पेस्ट गाळून घ्या. कांद्याचा रस तुमच्या टाळूवर नीट लावा. किमान ३० मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवा. [Photo Credit : Pexel.com]
या पद्धतीने कांद्याच्या रसचा केसांच्या वाढीसाठी उपयोग होतो आणि त्यामुळे तुमच्या सौंदर्यात भर पडते . [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]